शहरात कारवाई जिल्ह्यातील १६ तालुक्यात कधी…?
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड – अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने नांदेडमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत १६ लाख २८ हजार रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला आहे.याप्रकरणी दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहायक आयुक्त संजय चट्टे आणि सहायक आयुक्त राम भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड,ऋषिकेश मरेवार, अनिकेत मिसे,अरुण तम्मडवार,तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी,शिल्पा श्रीरामे,अमृता दुधाटे,नमुना सहायक बालाजी सोनटक्के आणि इतवारा पोलिस स्टेशनचे पो कॉ हरप्रीतसिंग सुकई यांच्या पथकाने मे.डायमंड ट्रेडर्स, अमेर फंक्शन हॉलजवळ, देगलूर नाका,नांदेड येथील पेढीवर छापा टाकला असता या तपासणीदरम्यान,पेढीमध्ये सय्यद मुबीन सय्यद गनी (वय ५१) आणि अजमोदिद्दिन अब्दुल हमीद (वय ४०) हे उपस्थित होते.
पथकाला पेढीमध्ये राजनिवास सुगंधीत पानमसाला,विमल पानमसाला,डायरेक्टर स्पेशल पानमसाला,AAA पानमसाला, मुसाफीर पानमसाला, आरएमडी पानमसाला, रजनीगंधा पानमसाला, सिग्नेचर पानमसाला,सितार गुटखा आणि विविध प्रकारचे सुगंधीत तंबाखू यांसारख्या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
या जप्त केलेल्या साठ्याची एकूण किंमत १६ लाख २८ हजार ४९ रुपये इतकी आहे
जप्त केलेला हा प्रतिबंधित साठा इतवारा पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून,सय्यद मुबीन सय्यद गनी आणि अजमोदिद्दिन अब्दुल हमीद यांच्याविरोधात अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावाड यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ आणि भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांनुसार फिर्याद दाखल केली आहे.पण जिल्यातील १६ तालुक्यात अवैध प्रतिबंधित गुटखा नश्याच्या गोळया चौका चकात सहज उपलब्ध होत असून विध्यार्थी तरुण पिढी बरबाद होताना दिसत आहे. परवा नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बेठकीत आज परेंत कोणीच आवाज उठवल्या नसलेल्या विषयी खा. रवींद्र चव्हाण यांनी जिल्यात नशेच्या गोळया,ड्रक्स,प्रतिबंधित केलेले कॉरॉक्स खोकल्यावर उपचाराचे औषधी,वाईटणर,अगदी सहज उपलब्ध होत असून त्या बदल आवाज उठण्यात आला आहे. खा. रवींद्र चव्हाण यांनी वरील षधी व नशेच्या गोळया विकणार्या वर कारवाई करा अशी मागणी केली असून नांदेड जिल्ह्यातील सुजाण नागरी कांचे या कारवाई कडे लक्ष लागून आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नागरिकांना भरपूर अपेक्षा आहेत.