हिमायतनगर शहरात मित्रपरिवार सोबत मोठ्या उत्सवामध्ये वाढदिवस साजरा करण्यात…
आभिषेक बकेवाड संपादक/
हिमायतनगर : व्यक्तिमत्वाबद्दल अंदाज बांधले जातात.तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून रहात नाही. निलेश आण्णा हे एक असेच उमदे,दिलदार,दिलखुलास व्यक्तिमत्व आहेत.आज निलेश आण्णा यांचा वाढदिवस आहे.यांची आज एवढी ओळख त्यांच्याबाबतीत पुरेशी नाही.तर समाजकारण आणि अर्थशास्त्राचा अभ्यासक अशी एक त्यांची वेगळी ओळख आहे. सहज,सोप्या आणि विनोदी शैलीत त्यांना उत्तम संवाद कौशल्य अवगत आहे.
निगर्वी,प्रेमळ आणि अत्यंत आदराचे बोलणे.कोणत्याही प्रसंगात जिव्हाळा,आपलेपणा जपण्याची आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभावगुण विरळाच!
चुकीचे वाटले तर जरुर समजावतील,सांगतील.एखाद्या क्षणी त्यांच्या पध्दतीने व्यक्तही होतील.परंतू मनात कुणाबद्दलही आकस ,राग न धरता तितक्याच स्वच्छ मनाने हाक मारुन एवढे काय रागवायचे? असे उलट विचारुन नेहमीच्या खळाळत्या हास्याने समोरच्याला आपलेसे करणारे हे व्यक्तिमत्व आहे. निलेश आण्णा कोडगिरे सामाजिकपयोगी एखादी भुमिका घेताना त्याची मांडणी,त्यांच्या स्वभावातला स्पष्टवक्तेपणा आणि आंतरिक असणारी तळमळ दिसुन येते. आर्य वैश्य सामाजात आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तरुणाला योग्य दिशा देणारे हे पहिले व्यक्तिमत्व आहे. निलेश आण्णा यांच्या मध्ये एक छान अभिनयाचे उत्तम अंग असलेला कलावंत दडलेला आहे.

आज ३० ऑगस्ट एक दिलदार व्यक्तिमत्त्व निस्वार्थी नेतृत्व हिमायतनगर शहरातील दिलखुलास व्यक्तिमत्व…. समाजाच्या विकासात्मक कामासाठी सदैव तत्पर व अग्रेसर आसणारे आपल्या सर्वांचे चाहते
आदरणीय मा.श्री निलेश गोविंदराव कोडगिरे उदगीरकर
आज आपला (२९) व्या वाढदिवस…. !आपल्या या जीवनच्या प्रवासात नेहमीच यशाचा सुगंध दरवळत राहो.या शुभकामनेसह…. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,आपणास उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या मनापासून मंगलमय शुभेच्छा,

शुभेच्छुक -नगरसेवक फेरोज खॉन,साईनाथ कोमावार,नितेश जैस्वाल,भय्या पळशीकर,पुंडलिक येनगुलवार, व सर्व मित्र परिवार