जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे भाजपात

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

राष्ट्रवादीला मोठा धक्का, किनवट बाजार समिती सभापतींसह ८ संचालकांचाही प्रवेश

प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण व खा. अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती

नांदेड प्रति हरजिंदर सिंघ संधू 

नांदेड – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम, अर्थ सभापती दिनकर दहिफळे, किनवट बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे तसेच ८ संचालकांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मुंबई येथील प्रदेश मुख्यालयात भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) हा मोठा धक्का मानला जातो आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, आ. तुषार राठोड, नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, नांदेड ग्रामीण दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

     यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णायक नेतृत्वावर विश्वास ठेवून, भाजपाच्या विकास आणि राष्ट्रीयत्वाच्या धोरणाला स्विकारून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या मागे आम्ही सर्वजण खंबीरपणे उभे राहू. भाजपाची विचारधारा गावागावांत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकदिलाने काम करू, असेही त्यांनी नमूद केले. 

आजच्या पक्षप्रवेशामुळे भाजपाला नांदेड आणि संपूर्ण मराठवाड्यात बळ मिळेल, असा विश्वास खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला. 

    याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश युवक सचिव अजित साबळे, किनवट बाजार समितीचे संचालक श्रीराम कांदे, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष तसेच किनवट बाजार समितीचे संचालक बालाजी बामणे, सुनील घुगे, प्रल्हाद सातव, प्रेमसिंग साबळे, कैलास बिज्जमवार, विद्या दासरवार, कुसुम मुंडे यांच्यासह शिवराज मुंडे, माधव मुंडे, उपसरपंच तारुसिंग पडवाळ, जेऊसिंग नाईक चोपाडे, संजय मुंडे, करतारसिंग बामण, रॉबिन साबळे यांनीही आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

Share This Article
error: Content is protected !!