शिवमहापुराण ज्ञानयज्ञ कथा महोत्सवालाभक्तगन उसळला

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

भव्य कलश रोहन यात्रेने दुमदुमला भक्तभावाने मगनपुरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.येथील रेणुकाई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक बास्टेवाड परिवाराच्या वतीने मगनपुरा-नवा मोंढा येथील बाजार समितीच्या मैदानावर काल पासून भव्य अशा शिव महापुराण ज्ञान यज्ञ कथा महोत्सवाला मोठ्या धुमधडाक्यात सुरुवात झाली असून कथा महोत्सवाच्या तत्पूर्वी भव्य कलश रोहन यात्रेने कथा महोत्सवाच्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला यावेळी शिव महापुराण कथाकार बिजनोर उत्तर प्रदेश येथील शिव कथाकार राधेश्यामजी व्यास महाराज यांच्या सूमुधुर वाणीतून अनेक शिवभक्तांनी कथेच्या पहिल्या दिवसाचा लाभ घेतला..

शिव महापुराण कथेसाठी नांदेड शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरातून अनेक भाविक भक्तांनी यावेळी या ठिकाणी शिव कथेचे श्रवण केले व शिव महापुराण कथा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राधेश्याम जी व्यास यांनी गणेश गौरी,नवग्रहादी उपासना,ग्रंथ आणि व्यास उपासना,व्रतिष्ठा आणि कथा महात्म्य रहस्य: कलिकालातील शिवपुराण कथेचे फलित काय आणि श्रवण पद्धती काय आहे.

मंगल कलक्षामध्ये कलश,कलश पाणी,आंब्याची फांदी का,कशी वापरावी? यावर श्रोत्यांना संबोधित केले..
कलश रोहन यात्रेची सुरुवात शिव महापुराण कथाकार श्री राधेश्यामजी व्यास महाराज, नांदेड भूषण जगदीश जी महाराज तसेच आयोजन समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा,मुख्य आयोजक रेणुकाई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.सौ चंदा जयराम बास्टेवाड तसेच डॉ.जयराम बास्टेवाड , डॉ. सौ.नेहा निलेश बास्टेवाड, डॉ निलेश बास्टेवाड,डॉ प्रशांत मेरगेवाड व रेणुकाई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ची संपूर्ण टीम आणि शिवभक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती..

Share This Article
error: Content is protected !!