तळेगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.शैला पाडोळसे तर उपाध्यक्षपदी अरुण सपकाळ यांची निवड

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

जामनेर ता.प्रतिनिधी/
जामनेर
: तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीची नुकतीच निवड करण्यात आली असून अध्यक्षपदीः- सौ.शैला पाडोळसे तर उपाध्यक्षपदीः-
अरुण सपकाळ यांची निवड करण्यात आली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य पदी निवड प्रसंगी
सदस्यः- विनोद पाडोळसे,सौ.देवबाई सुरळकर,गोपाल सपकाळ, सौ.भारती राऊत, सौ.किरण भोरे, आक्रोश माळी,
संजय माळी, महमूदखाँ पठान. सौ.पल्लवी वाघ,सौ.सरिता वाघ,भीमराव घोरपड़े,तर शिक्षणप्रेमी प्रशांत वाघ तर संचिव मुख्यध्यापक वाघ यांची निवड करण्यात आली असुन यावेळी शहापूर केंद्राचे केंद्रप्रमुख विकास वराडे उर्दू शाळेचे केंद्र प्रमुख रफीकसर तळेगांव शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षण वृंद सर पालक उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष,उपाध्यक्ष, सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्य यांनी शाळेच्या विकासासाठी,व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाटी गेल्या आठ वर्षापासून विज्ञान विषय पदविधर शिक्षकांची जागा भरलेली नसुन इयत्ता ६ वी ते ८ वी ची विद्यार्थी संख्या १६० आहे. तरी विद्यार्थ्यांचे विज्ञान व गणित विषयाचे नुकसान होत आहे. याचा परिणाम विद्यार्थी पटसंख्येवर होऊ लागला आहे. पटसंख्या टिकविण्यासाठी, गरिबांचीशाळा बंद होऊ नये. यासाठी शा.व्य.समिती, गावातील विद्यार्थी पालक,शिक्षणप्रेमी नागरिक व शिक्षक वृंद कसोशीने आठ वर्षे झाले प्रयत्न करित आहे.सन २०१६ ला ४२५ विद्यार्थी पटसंख्या होती. परंतु २०२३ मध्ये ३१७ पटसंख्या झाली.इयत्ता १ली ते ८ वी प्रयत्न जि.प. शाळेची तालुक्यातच काय? पण जिल्ह्यात सुद्धा एवढी पटसंख्या नाही. करिता लोक प्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून ग्रेड.मुख्याध्यापक इयत्ता १ ली ते ५ वी साटी १ पद व ६ वी ते ८वी साटी १पद मिळून – २ पदे विज्ञान विषय शिक्षकांची- २ पदे तात्काळ भरावी जेणेकरूण शाळेचे नुकसान टळेल व भविष्यात पटसंख्या वाचेल अशी अपेक्षा तळेगांव ग्रामस्त व्यक्त करित आहे.
तसेच येथे ग्रेडेट मुख्याध्यापकाची आवश्यकता असुन त्या साठी प्रयत्न करेल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्याचे अश्वसन यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष सदस्य यांनी दिले.

Share This Article
error: Content is protected !!