पाच वर्षांपूर्वी मुद्रांक शुल्क कमी भरले म्हणून शेतकऱ्यांला नोटीस वर नोटीस

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

धर्माबाद रजिस्ट्री कार्यालयातील प्रकार

अधिका-यांची चुकिची, शेतकऱ्यांना सजा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.31.जिल्ह्यातील धर्माबाद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात पाच वर्षांपूर्वी,रजिस्ट्री करताना शेतकऱ्यांनी मुद्रांक शुल्क कमी भरणा केले म्हणून सदरील शेतकऱ्यांना सतत नोटीस बजावली जात असल्यामुळे शेतक-यांची झोप उडाली आहे.अधिकारी यांचा चुका, शेतकऱ्यांना सजा अशी अवस्था येथील कार्यालयात झाली असल्यामुळे
केवळ शेतकऱ्यांची आर्थिक लुट केली जात असल्याने येथील अधिकारी बद्दल संताप व्यक्त होत आहे.

धर्माबाद तालुक्यात सन २०१७ मध्ये ‌अनेक शेतकऱ्यांचे शेतीची रजिस्ट्री येथील दुय्यम निबंधक कार्यालयात झाले.शासनाच्या परिपत्रकानुसार व जमिनीच्या मुल्यांकन नुसार मुद्रांक शुल्क चार टक्के व नोंदणी फी एक टक्का यानुसार येथील दुय्यम निबंधक अधिकारी शिंदे यांनी रजिस्ट्री केली.या घटनेला पाच वर्षे उलटले आता येथील दुसरे नुतन रुजु झालेले दुय्यम निबंधक अधिकारी आर.पी.गायकवाड यांनी शेतकऱ्यांकडून पैसे कसे काढायचे अशी शक्कल लढवून सन २०१७ मध्ये झालेले रजिस्ट्रीचे मुद्रांक शुल्क पुर्वीच्या अधिकारी यांने कमी भरणा केला आहे ते आता परत डबल शुल्क भरावे लागते अशी नोटीसा चाळीस शेतकऱ्यांना दिल्याने शेतकरी हतबल झाले असून शेतकऱ्यांत रोष निर्माण झाला आहे.सतत शेतकऱ्यांना नोटीस, तुम्हच्या शेतीवर बोजा पडेल, कारवाई होईल,असी भीती रजिस्ट्री कार्यालयातुन दिली जात आहे.या भीतीपोटी काही अज्ञानी शेतकरी भीतीने मुद्रांक शुल्क भरले तर काही शेतकरी मुद्रांक शुल्क भरले नाहीत.या विनाकारण नोटीस बद्दल संतापाची लाट उसळली आहे.मार्च ते जुलै पर्यंत तीन चार नोटीस बजावली आहेत.दूष्काळ परिस्थितीत पन्नास पन्नास हजार रुपये कुठून आणणार अशी चिंता शेतकऱ्यांत वाटली असुन शेतकऱ्यांत तीव्र संताप होत आहे.

  • सन २०१७ मध्ये दुय्यम निबंधक अधिकारी यांनी मुद्रांक शुल्क कमी भरणा लावला म्हणून आताचे अधिकारी आर.पी. गायकवाड यांनी डब्बल रुपये भरा म्हणून शेतकऱ्यांना नोटीसा दिले.शेतीचे मुल्यांकन काढणारे, मुद्रांक शुल्क,फी लावणारे त्यांच्याच कार्यालयातील अधिकारी आहेत,मग चुका कोणी केली ? शेतकऱ्यांनी केली का ? जेवढी मुद्रांक सांगितले तेवढे शेतकऱ्यांनी त्यावेळी भरले, चार वर्षे उलटले आता कशी जाग आली ? एक नाही,दोन नाही तब्बल चाळीस शेतक-यांचे चुका कशे होतात ? अधिकारी चुका करतात तर अधिकारी यांनी फी भरुन घ्यावे ?,त्यांचा चुका शेतकऱ्यांना का सजा ? असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. केवळ शेतकऱ्यांकडून पैसे काढण्याचा प्रकार येथील अधिकारी करित आहेत अशी उलटसुलट चर्चा शेतक-यातुन होत आहे.

१) सन २०१७ मध्ये दुय्यम निबंधक अधिकारी यांनी मुद्रांक शुल्क चुकुन कमी भरणा लावला असावा असे वाटते.आम्ही नोटीस शेतकऱ्यांना दिली, शेतकऱ्यांनी भरा म्हणत नाही नको भरा म्हणत नाही,हे मला माहित नाही वरिष्ठांकडे कळवतो असे उडवा उडवीचे उत्तर दुय्यम निबंधक अधिकारी आर.पी.गायकवाड यांनी दिले.

२) सन २०१७ मध्ये मी विकत घेतलेल्या ४१ आर.जमीनीची रजिस्ट्री केली.त्यावेळी जसे साहेबांनी सांगितले त्या पध्दतीने मुद्रांक शुल्क भरले आणि रजिस्ट्री झाली.पाच वर्षे झाले अचानक आता याच कार्यालयातुन नोटीस आली.तुम्ही मुद्रांक शुल्क कमी भरले आहे पैसे भरा मी थक्क झालो.त्यांनी केलेल्या चुका आम्हा गरीब शेतकऱ्यांना सजा . पुर्विच शेतकरी संकटात असताना असा अधिकारी मुळे फाशी घेयाची वेळ आली आहे.असे मत तालुक्यातील बेल्लुर (खु)येथील शेतकरी राम कांबळे यांनी सांगितले.

Share This Article
error: Content is protected !!