हदगाव व पीरनगर भागात पोलीसांनी छापा टाकून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हदगाव ता.प्रतिनिधी/

हदगाव : पोलिसांच्या पथकाने नांदेड शहरातील पिरनगर आणि हदगाव शहरात शिवाजी चौक येथे जुगार अड्यावर छापा मारून २५ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख २३ हजार २८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याबाबत हदगाव आणि विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील पिरनगर येथे शेख सल्लाऊद्दीन शेख करीमोद्दीन यांच्या मालकीच्या बंद घरात सोळा आरोपी विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार मटका खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख ९१ हजार ९१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. य़ाबाबत पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार गौड करत आहेत.

दुसऱ्या घटनेत हदगाव शहरातील शिवाजी चौक भागात नऊ आरोपी विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

पोलिसांनी छापा टाकून बाराशे रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि १९ हजार ३७० रुपये रोख असा एकूण ३१ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोलिस जमादार खाकोबा चिंतले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
error: Content is protected !!