गेल्याचं वर्षी बांधकाम झालेल्या शाळेचे छत कोसळले अनेक विद्यार्थी गंभीर जखमी

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.1.जिल्हा परिषदेची शाळा सुरु असताना शाळेचे छत अचानक कोसळले.यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे. सदरची घटना नांदेडच्या हदगाव तालुक्यातील रावणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत घडली.

जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था हा गंभीर विषय होत चालला आहे. पडक्या,नादुरुस्त शाळा खोल्यांमध्ये वर्ग भरविले जातात.परंतु नव्याने बांधकाम झालेल्या नांदेडच्या हदगाव येथील जिल्हा परिषदेची शाळा रोजप्रमाणे भरली होती. विद्यार्थी अभ्यास करण्यात गुंग होते. अचानक गेल्यावर्षी बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीचे स्लॅब अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यावर कोसळले. यामध्ये वैभव जाधव हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे.

इतर विद्यार्थी वर्गामध्ये अभ्यास करत होते.त्यामुळे सुदैवाने मोठी घटना टळली.घटनेनंतर शाळेत एकच धावपळ उडाली.मागच्या वर्षीच या शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु बोगस काम केल्याने या इमारतीचे छत कोसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

बोगस काम करणाऱ्या गुत्तेदार आणि जिल्हा परिषद अभियंत्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली. घटना घडली असता अद्याप या शाळेला शिक्षण विभागाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट न दिल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Share This Article
error: Content is protected !!