उमरखेड ता.प्रतिनिधी/मनोज राहुलवाड
उमरखेड : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या भागात मराठा आरक्षण मागणी करणऱ्या आंदोलकांवर येथील पोलिसांनी हवेत गोळीबार करून अश्रुध्रवाचा वापर करीत महिला लहान मुले वयवृध्दांना घेरून मोठ्या प्रमाणात मारहाण केली राज्य सरकारने अमानुष वागणूक दिली या दडपशाही सरकारचा निषेध म्हणून मराठा आरक्षणाला पाठिंबा देत आज रविवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२३ सकाळी १० वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात (जुने बस स्टँड)छत्रपती शिवाजी महाराज व तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आक्रमक झालेल्या समाज बांधवांनी एकीचे बळ दाखऊन दिले या आंदोलनात शेकडोच्या वर तालुक्यातील समाज बांधवांनी सहभाग घेतला होता
जालना अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण मागणी करणऱ्या समाज बांधवावर अमानुषपणे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या पोलिसांनी चिरडले याचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल असे आंदोलनकर्ते म्हणाले जालना येथे लाठीचार्ज करण्यात आला यामध्ये महिला वृद्ध अनेकजण दगडफेक झाल्याने रक्तबंबाळ झालेत सरकारचा निषेध म्हणून सर्व बाजारपेठ दिवसभर बंद ठेऊन व्यापारी वर्गाने पाठिंबा दिला आणि तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनेकडून या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला