सकल मराठा आंदोलकांनी आजी-माजी आमदारांना मोर्चातून हाकललं

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड : जिल्ह्यातही मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला होता या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी सहभाग घेतला होता. मात्र आंदोल कांनी राजकीय नेत्यांनी आमच्या आंदोलनाचा भाग होऊ नये म्हणून त्यांना परत पाठवले. त्यामुळे काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांना आंदोलनातून माघारी फिरावे लागले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे कट्टर व माजी आमदार अमरनाथ राजुरकर यांना मोर्चात सहभागी होण्यास आंदोलकांनी मज्जाव केला होता. तर नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांनाही मोर्चातून काडता पाय घ्यावा लागला. आंदोलकाच्या भावना तीव्र आहेत, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मोर्चात सहभागी होऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. पण आमचा पूर्णपणे पाठिंबा मराठा समाजाला आहे. त्यांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही मोर्चातून माघार घेत असल्याचं असं व्रत अमरनाथ राजूरकर यांनी व्यक्त केले.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!