वीज पडून अशोक पाटील नागणे जागीच ठार

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : जिल्यातील बिलोली तालुक्या मधील मौजे हिंगणी येथील वीज अंगावर पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याचे दुर्दैवी घटना.रविवार (दि.३) दुपारी दोन अडीच च्या सुमारास घडली.अशोक रामराव पाटील नागंणे (४८) असे मृत तरुणाचे नाव आहे.आणि तसेच त्यांच्या पाश्चात एक मुलगा आणि मुलगी आहे.

हिगंणी परिसरात रविवारी दुपारपानतंर विजांच्या कडकडासह पावसाला सुरूवात झाली.अशोक हा गुरे (पशुधन )रानात चारवण्यासाठी घेऊन साठी गेला होता.तरीही तो सायंकाळी घरी परतला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी शेताच्या बाजुला शोध घेतला पण तो सापडला नाही.

सोमवारी सकाळी लवकर एका शेतकऱ्याने त्याच्या शेताकडून येत असताना अशोक पाटील नागणे एका दगडापाशी झोपलेला दिसला म्हणून त्या शेतकऱ्याने कोण आहे म्हणून जवळ जाऊन पाहिला तर त्याच्या अंगावर विज पडलेले दिसून आले.अशोक पाटील नागणे ला बिलोली येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

तथापि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात शेव विच्छेदनानंतर मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Share This Article
error: Content is protected !!