सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी नायगाव कडकडीत बंद……

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव : तालुक्यातील सकल मराठा समाजाने विविध मागण्यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने व निदर्शने करून समाजाच्या विविध मागण्या हे सरकारकडे करत असून त्याच अनुषंगाने ज
जालना जिल्ह्यातील मनोज पाटील जरांगे यांनी गेल्या 5-6 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांची तब्येत अत्यंत खालवली असल्याने सरकारच्या वतीने त्यांना उपोषण मागे घेण्याचे विनंती केली असता श्री मनोज पाटील यांनी त्यांच्या आपण भूमिकीवर ठाम राहून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही असेच बसू असा सवाल सरकारला केले असता सरकारने व गृहमंत्र्यांनी पोलीस प्रशासनाला आदेश देऊन तेथील परिस्थिती व त्याच्या बाहेर जात असून तेथील तुमच्या पद्धतीने तुम्ही कायदा हातात घ्या असे सूचना केले असल्याने जिल्हा पोलीस यंत्रणेने त्या उपोषणकर्त्यांच्या गावात जाऊन महिलावर व युवकावर आणि गावातील सर्व मराठा बांधवावर लाटी चार्ज करून त्यांना बेदम मारण्यात आले आहे व तेथील अनेक युवकावर खोटे केसेस करून खोट्या केसेस खाली युवकांचे जीवन उध्वस्त केले आहे. म्हणून सबंध राज्यांमध्ये सकल मराठा समाज बांधवांनी जागोजागी आंदोलन पुकारले आहे.
सदर मराठा समाजाच्या मागणे हे अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत आणि वारंवार असे लाखोंच्या संख्येने आंदोलने मोर्चे करून देखील समाजाला योग्य न्याय मिळत नाही आणि समाजाकडे सरकारने गांभीर्य घेत नाही अशाच सरकारच्या नाकर्तेपणामुळे सद्यस्थितीत मराठा समाजाची राज्यात गडचिपि होताना दिसून येत आहे राज्यामध्ये मराठा समाजाची एक नंबरची लोकसंख्या असून देखील समाजाला सामाजिक आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या आरक्षण हवे आहे तरी समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी अनेकांचे जीव गमवावे लागले असून देखील सरकार मात्र झोपेच्या सोंगात दिसून येत आहे. सकल मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा व जय शिवराय जय जिजाऊ जय घोषणा देऊन सरकारला जागृत करण्याचे काम करत असून गांभीर्य घेत नसल्याने मराठा समाजात मोठा असंतोष निर्माण झाला आहे आणि मराठा समाजा भावना वरच्यावर तीव्र होत चालले दिसून येत आहे. आज मराठा समाज बांधवांनी नायगाव शहरांमध्ये केंद्र व राज्य सरकारचा जाहीर निषेध करून सरकारला धारेवर धरून सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमाव जमवून आंदोलने केले आहेत.
सकळ मराठा समाज बांधवांनी राज्यातील ग्रामीण भागापासून ते शहरी भागामध्ये अनेक ठिकाणी विविध प्रकारचे निदर्शने करून मराठा समाजाच्या मागणीसाठी ठाम असल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यातील जे अमानुषपणे लाटी चार्ज करण्यात आला आहे व गोळीबार करून युवकाला बेदम मारहाण करून खोटे केसेस युवकावर दाखल करून मराठा समाजाला सत्ताधारी यांनी वेठीस धरले असता मराठा समाजाच्या वतीने मात्र सरकारच्या विरुद्ध मोठा एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी देशात आणि राज्यात राजकारण केल्याचे मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे. पण राज्यामध्ये आणि देशांमध्ये मराठा समाजाचे जास्त प्रतिनिधी असून देखील हे प्रतिनिधी सत्तेसाठी गुलाम म्हणून बसलेले आहेत. समाजाच्या मतावर मोठे झालेली ही नेतेमंडळी आज समाजावर अशी वाईट कृत्य असून समाजाच्या मागणीसाठी एकही आमदार किंवा खासदार विधान भवनामध्ये व संसदेमध्ये विषय मांडायला तयार नाहीत यामुळे समाजाला न्यायापासून वंचित राहावे लागत आहे. म्हणून जोपर्यंत आम्हा समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असेच राज्यामध्ये विविध गाणे सरकारला घेण्यासाठी व आमच्या मागणी पूर्ण करण्यासाठी याही पुढे आंदोलने मोर्चे असे विविध प्रकारचे करून आम्ही सरकारकडे न्याय मागू असे सकल मराठा समाजाच्या वतीने भावना व्यक्त करण्यात आले आहेत.

Share This Article
error: Content is protected !!