भोकर ता.प्रतिनिधी/ गोविंद चिखलवाड
भोकर : सकल मराठा समाजाणे पुकारलेला भोकर बंदला 100% प्रतिसाद मिळाला असून भोकर शहरातील सर्व लहान मोठे दुकाने कडकडीत बंद ठेवून सर्वांनी सहकार्य केले आणि कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणी प्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर उमटत असून सकल मराठा समाजाने आज मंगळवारी भोकार बंदची हाक दिली होती. या बंदला भोकार शहरातील सर्व दुकाने व्यापारांनी आपली दुकाने स्व इच्छाने बंद ठेवून मराठा समाजाला त्यांनी प्रतिसाद दिला.सखल मराठा समाजाच्या मागण्याना आणि आणि भोकर बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष साईप्रसाद जटालवार शहरातील मुस्लिम संघटना, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी आदी पक्षांनी जाहीर पाठिंबा दर्शविला होता. भोकर बंद दरम्यान पोलीस स्टेशन भोकर चे पोलीस निरीक्षण नानासाहेब उबाळे यांनी चोख बंदोबस्त लावला होता .