नांदेड मध्ये १५,३१,०००/- रुपय ७१.५५० किलो ग्राम गांजा जप्त तिन आरोपी ताब्यात

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

स्थानिक गुन्हे शाखा,नांदेडची दमदार कार्यवाही

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : शहरातील पोलीस ठाणे विमानतळ हद्दीमध्ये कामठा (खु.)माळटेकडी गुरुव्दारा मार्गे नमस्कार चौक, नांदेड कडे काही इसम एन डी पी एस कायदयाच्या तरतुदीचा भंग करुन अंमली पदार्थ गांजाची चोरटी विक्री करण्याचे उद्देशाने घेवुन जात आहेत अशी खात्रीशिर माहीती स्थागुशाचे पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काळे यांना मिळाली.त्यांनी मिळालेली माहीती वरीष्ठांना देवुन त्यांचे आदेशाने स्थागुशाचे पोलीस अमंलदार,महीला पोलीस अमलदार,महसुलचे राजपत्रीत अधिकारी व पोलीस राजपत्रीत अधिकारी यांना सोबत घेवुन आज दिनांक ०६/०९/२०२३ रोजी ११.३० वाजता मिळालेल्या माहीतीचे ठिकाणी माळटेकडी गुरुवदारा जवळील ओव्हर ब्रीजचे खाली जावुन सापळा रचुन थांबले असताना,ठीक १२.५५ वाजताचे सुमारास एक काळया रंगाचा ॲटो क्रमांक एम एच २६ बी डी ४५०९ हा आला.नमुद ॲटोची पंचासमक्ष तसेच राजपत्रीत अधिकारी यांचे समक्ष झडती घेतली असता,त्यामध्ये अमली पदार्थ गांजाचे प्लॅस्टीकमध्ये छोटे व मोठे पॉकेट असा ७१.५५० किलो ग्राम ओलसर गांजा किंमती १५,३१,०००/- रुपयाचा मिळुन आला.सदरचा गांजा वाहतुक करत असताना नमुद ऑटोमध्ये आरोपी नामे १) मिर्झा मोसीन नजीर बेग वय २२ वर्ष व्यवसाय अॅटोचालक रा.मुजामपेठ धनेगाव नांदेड २) सयद मुक्तार महमद सलीम वय ३५ वर्ष व्यवसाय बेकार रा.हिंगोली नाका नांदेड ३) परविन बेगम भ्र.सयद मुक्तार वय ३० वर्ष व्यवसाय बेकार रा.हिंगोली नाका नांदेड हे मिळुन आले.मिळुन आलेल्या आरोपीतांनी सदरचा गांजा हा ४) जोहराबी ऊर्फ बब्बा खाला भ्र. अन्वर खान पठाण रा टायरबोर्ड नांदेड हीने विक्री करण्यासाठी दिला असल्याचे सांगीतले आहे.

मिळुन आलेला अमली पदार्थ गांजा जप्त करण्यात आला असुन नमुद आरोपीताविरुध्द पोउपनि / दत्तात्रय काळे यांचे फिर्यादवरुन पोलीस ठाणे विमानतळ येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगिरी,श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक, नांदेड,अबिनाश कुमार अपर पोलीस अधीक्षक,नांदेड,खंडेराव धरणे,अपर पोलीस अधीक्षक,भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली,श्री.व्दारकादास चिखलीकर,पो.नि.स्थागूशा नांदेड,पोनि / नागनाथ आयलाने, पो स्टे विमानतळ,नायब तहसीलदार/ के.बी.डांगे, पोउपनि / दत्तात्रय काळे, सपोउपनि/ माधव केंद्रे, पोह/ गंगाधर कदम,बालाजी तेलंग, पोकों/विलास कदम,गणेश धुमाळ,रणधीर राजबन्सी,महेश बडगु,गजानन बयनवाड मपोहेकॉ पंचफुला फुलारी, महेजबीन शेख,चालक पोकॉ/अर्जुन शिंदे,कलीम शेख स्थागुशा,नांदेड यांनी पार पाडली आहे.सदर पथकाचे मा.पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!