नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.7.काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांच्यासह नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ.ज्योती मनीष कदम आणि नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ऍडव्होकेट धम्मपाल कदम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आज काँग्रेसला अखेरचा जयभीम करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे.आ.बालाजी कल्याणकर यांच्या पुढाकारातून हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत वर्षा निवासस्थानी पार पडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात शिवसेनेची पकड अधिक घट्ट होत आहे. शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते लाईन लावून उभे असताना आ. बालाजीराव कल्याणकर यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ सर्व अर्थाने मजबूत करण्यासाठी सपाटा लावला आहे.काँग्रेसला शह देत मनपाच्या माजी सभापती सभापती सौ अपर्णा नेरलकर यांचा मुंबईत शिवसेनेत पक्षप्रवेश झाल्यानंतर आठच दिवसात काँग्रेसला आ.बालाजी कल्याणकर यांनी आणखीन एक धक्का दिला आहे.
काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य मंगेश कदम यांच्यासह नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे माजी नगरसेविकास व ज्योती मनीष कदम,नांदेड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव ऍडमिट धम्मपाल कदम यांच्यासह महासचिव युवक काँग्रेस विकास गायकवाड,प्रवीण वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज बाळासाहेबांची शिवसेनेत प्रवेश पक्षप्रवेश केला आहे . मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले आहे
जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीमध्ये एक अग्रणी चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगेश कदम यांनी आता काँग्रेसला अखेरचा जयभीम करत शिवबंधन बांधल्याने नांदेड उत्तर मध्ये शिवसेनेला बळकटी येणार आहे तर काँग्रेसला जबर फटका बसणार आहे. आ. बालाजीराव कल्याणकर या अनुषंगाने बोलताना म्हणाले की,नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यात आगामी काळात सर्व समूहाला सोबत घेऊन चालण्याचा मनोदय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्याने त्यानुसार नांदेड जिल्ह्यात शिवसेना अधिक मजबूत करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे.मंगेश कदम आणि त्यांचे सहकार्याच्या पक्षप्रवेशामुळे निश्चितपणे या भागात शिवसेना अधिक बळकट होईल. आंबेडकरी समाजाला खऱ्या अर्थाने न्याय देता येईल असा विश्वासही आ.बालाजी कल्याणकर यांनी व्यक्त केला.