नाशिक : महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी अंतर्गत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने ३ सप्टेंबर पासुन सुरु झालेली जनसंवाद यात्रा इगतपुरी तालुक्यात उदंड प्रतिसादात सुरू असुन वाढती महागार्इ, तरुणाना न मिळालेला रोजगार, मराठा आरक्षण प्रश्नी सरकारची उदासीनता, बॅंका, एल आय सी व रेल्वे यांचे खाजगीकरण अशा अनेक बाबींची पोलखोल या यात्रेनिमित्त करण्यात येत असुन इगतपुरित या यात्रेच नेतृत्व आमदार हिरामण खोसकर, कॉग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, जेष्ठ नेते जनार्दन माळी हे करत आहेत भारत जोड़ो यात्रेला एक वर्ष पूर्ण होत असतानाच या यात्रेला विशेष महत्व प्राप्त झाले असुन नागरिकांचा मोठा प्रतिसाद वाढत आहे
आज वाडिवर्हे, गोंदे, कुर्हेगाव, बेलगाव कुर्हे, नांदूरवैद्य, साकुर, धामणगाव, धामणी पासून सुरु झालेली ही यात्रा घोटी शहरात चौक सभा घेवुन सांगता झाली यावेळी गेल्या नऊ वर्षांत मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ यांनी करताना राज्य सरकार हे कुचकामी असुन कॉग्रेस पक्ष येनार्या काळात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात उभारी घेवुन जनतेस न्याय देइल असा विश्वास व्यक्त केला
यावेळी प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सचिव भास्कर गुंजाळ,जेष्ठ नेते जनार्दन माळी,कचरू शिंदे,संदीप गुळवे,महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील तालुकाध्यक्ष रमेश जाधव, मा अध्यक्ष रामदास पाटील धांडे, बाळासाहेब कुकड़े,उत्तम भोसले, जेष्ठ नेते बाळासाहेब वालझाड़े, निवृति पाटील कातोरे,इगतपुरी शहर अध्यक्ष संतोष सोनवणे,महिला अध्यक्षा मनीषा मालूंजकर,अॅड जी पी चव्हाण,अरुण गायकर,सुदाम भोर,बाळासाहेब लंगड़े,प्रकाश तोकडे,पांडुरंग शिंदे,जयराम धांडे,संपत मुसळे,ज्ञानेश्वर खातळे,गौतम गरुड़,चंदू सेठ किर्वे,विश्वनाथ अहिरे, रेवननाथ गुंजाळ, मा उपसरपंच किसनराव गिते, नंदराज गुलवे, रघुनाथ खातले, पोलिस पाटील मधुकर धांडे, सुरेश धांडे, ज्ञानेश्वर कडू, भिका शिंदे,प्रकाश तात्या बेलेकर, बाजार समिती संचालक संपत वाज़े, खंडू परदेशी, भास्कर खोंसकर, अमित उपाध्ये आकाश दिवटे, संपत मुसळे यांच्यासह मोठया प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते