बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत ढाणकी दुरक्षेत्र येथे शांतता कमिटी मीटिंग संपन्न

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

उमरखेड ता.प्रतिनिधी : मनोज राहुलवाड

उमरखेड : काल दिनांक ५/९/२०२३ रोजी ढाणकी येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शांतता कमिटी मीटिंग संपन्न करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बिटरगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड मॅडम ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराव चंद्रे, रामराव गायकवाड, ढाणकी नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष जहीर भाई, कृषी उत्पन्न बाजार समिती कॉटन मार्केट उमरखेड सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, खाजाभाई कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता तोटेवाड , एडवोकेट येरावार, विष्णुदास जी वर्मा, आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी शहरांमध्ये येणाऱ्या गोकुळाष्टमी, पोळा व गणेशोत्सवानिमित्त, हे उत्सव शांततेत व आनंदात पार पाडावे असे मनोगत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस स्टेशनच्या ठाणेदार सुजाता बनसोड यांनी यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. गणेश मंडळातील अध्यक्ष , सदस्यांना , शहरामध्ये होत असलेल्या धार्मिक उत्सवांमध्ये कोणत्याही गोष्टीचा गालबोट न लागता उत्सव शांततेत पार पाडावे. कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. तसेच गावातील मिरवणूक मार्गे रस्ता हा खड्डे मय झालेला आहे तो नगरपंचायतने त्वरित खडक व मरूम टाकून दुरुस्त करण्यात यावा. मिरवणूक मार्गामध्ये येणाऱ्या नालीवर पूल आहे त्या पुलावर भगदाड पडलेले असून ते भरदाड बांधकाम करून नगरपंचायत नि त्वरित बुजवावे . तसेच एम एस सी बी कार्यकारी अभियंता यांना सुद्धा निमंत्रित केले गेले होते. शहरातील विद्युत तार हे खाली लटकले आहे ते सुद्धा गणेश उत्सवा दरम्यान योग्य ती जोडनी करून घ्यावे. जेणेकरून गणेश उत्सव स्थापनेच्या दिवशी किंवा मिरवणुकीच्या दिवशी विद्युत तारेचा बाधा येऊ नये . याची शाश्वती घ्यावी. व घरापुढे येणाऱ्या छपऱ्या मुळे मिरवणूकिस बाधा येऊ नये या करिता नगर पंचायत ने त्या छप्र्या त्वरित काढण्यात याव्या . कार्यक्रमाची सुरुवात ही शांतता कमिटी मीटिंगमध्ये आलेल्या सर्वच मान्यवरांना बनसोड मॅडम यांनी राखी बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व जी ओवाळणी देण्यात आली होती १०००० रू ती ओवाळणी मदत म्हणून नरेंद्र नारमवाड अर्थात काही दिवस खेरीज कविता नारमवाड ,हीची पतीने गळा कापून हत्या करण्यात आली होती त्या बालकास ही ओवाळणी मदत म्हणून दिली गेली. तसेच बिटरगाव पोलीस स्टेशन मार्फत पाच हजार रुपये नरेंद्रस रक्कम मदत म्हणून देण्यात आली. व गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे डॉ दिनेश जयस्वाल याना श्रावण मासात रुग्णांची मोफत तपासणी करीत असल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. अनिल तोडतकर हा युवक मूर्त व जखमी रुग्णांनाची हॉस्पिटल येथे पोहोचणे व स्मशानभूमीपर्यंत गाडी ने नेने याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला व शहरातील ज्या ज्या पक्षाचे शहराध्यक्ष, नेते मंडळी, नगरसेवक यांनचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नागेश महाजन पत्रकार यांनी केले, तरआभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक टीपूर्णे साहेबांनी केले.

Share This Article
error: Content is protected !!