जय जवान सहकारी पतसंस्था म.धनेगाव,ता.व जि नांदेडचा दहावा वर्धापन दिन सोहळाचे आयोजन

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/

नांदेड : भारतीय माजी सैनिक संघटना नांदेड तर्फे संचालीत या पतसंस्थेचा दहावा वर्धापन सोहळा दिनांक 10 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी 11 वाजता संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामराव धडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.

प्रमुख पाहुणे मा. श्री महेश कुमार डोईफोडे ,आयुक्त मनपा नांदेड,श्री.महेश वडदकर, निवासी उपजिल्हाधिकारी तसेच सैनिक कल्याण अधिकारी नांदेड,श्री शंतनू डोईफोडे संपादक दै प्रजावाणी,कर्नल एम रंगाराव,ऑफिसर कमांडींग,52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी,ब्रिगेडियर सुमंत दशरथ( नि), लेफ्टनंट कमांडर सोपानराव डोके (नि) ,ओ आय सी ,ईसी एच एस. तसेच सर्व माजी सैनिक संघटना समन्वय समिती सदस्यांचे विशेष उपस्थिती आयोजित केली आहे.

संस्थेच्या सर्व सभासदांना विनंती करण्यात येते की त्यांनी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित रहावे.

नवीन सभासद होण्यास इच्छुक माजी सैनिकांनी आधार कार्ड व ओळखपत्र आणल्यास नोंदणी करून सहभागी होता येईल.
या कार्यक्रमात वीर नारी,वीर पिता व वीर माता तसेच जे मान्यवर माजी सैनिकांच्या कल्याणार्थ विविध क्षेत्रातील सेवा देत आहेत त्यांचा सत्कार करण्यात येईल.
कार्यक्रमाची दि. व वेळ : दि. 10 सप्टेंबर रोजी रविवारी सकाळी 11 वाजता हॉटेल सेंट्रल पार्क, पहिला माळा,स्टेडियम समोर,रद्द द गोकुळनगर रेल्वे स्टेशन रोड,नांदेड.येथे आयोजित केला आहे.

Share This Article
error: Content is protected !!