नांदेड शहर प्रतिनिधी/
नांदेड : दि. ८ सप्टेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे माननीय अभिजीत राऊत साहेब जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल मॅडम तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांच्या उपस्थितीत क्षयरोग फोरम ची बैठक पार पडली..
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतिश कोपूरवाड यांनी क्षयरोग विषयी सविस्तर माहिती दिली. निक्षय मित्र बोलवून सर्व क्षयरोग रूग्ण यांना फुड बास्केट चे वाटप केले.
यावेळी डॉ.खैरे साहेब जागतिक सल्लागार व डॉ.मिरदुडे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र हे उपस्थित होते.