हिमायतनगर प्रतिनिधी/लक्ष्मण भैरेवाड
हिमायतनगर : तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेले बोरगडी देवाचे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपाळकाला व दहीहंडी महोत्सव निमित्त भव्य चित्रकला व रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती. दरम्यान कार्यक्रमाच्या निमित्ताने संगीत विशारद गायनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता संगीताच्या माध्यमातून श्रीकृष्ण चरित्र कथा व हरिपाठ यांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्याचे आयोजन नवतरुण मित्र मंडळ व क्षेत्र बोरगडी देवांची यांच्या वतीने आयोजित केले असता या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत कार्यक्रमाचा आनंद घेतला आहे. सदर कार्यक्रमांमध्ये बोरगडी देवाचे गावातील भाविक व परिसरातील भाविक भक्तांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने एकत्र येत गोपाळांचा मेळा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. बोरगडी देवाची हे तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांनी सातत्याने या गावात येऊन श्री मारुतीरायांचे व गावातील देवतांचे दर्शन घेत असतात. नवसाला पावणारा मारुती राया असल्याने नांदेड जिल्ह्यात तो प्रसिद्ध असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन बोरगडी येथील नवयुवक तरुणांनी सहभाग घेऊन विविध प्रकारचे उपक्रम राबवित श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोरगडी येथील सुपुत्र हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज बोरगडीकर यांच्या वाणीतून श्रीकृष्ण चरित्र पठाण करण्यात आले आहे. लहान लहान मुलांनी सहभाग घेऊन डीजे व बँड पथक लावण्याऐवजी लहान बालकांना एक उत्साहित करून त्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आणि या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने परम पूज्य गुरुवर्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ पिंपळगाव महाराजांनी देखील यात सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा. आणि या कार्यक्रमाला गावातील मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग दिसून आला आहे.