मयत वनमजूर कौशल्याबाई परचाके यांना आर्थिक मदत द्या

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

बिरसा क्रांती दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
महामहीम राष्ट्रपती मा.श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना दिले निवेदन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :दि.9.जिल्यातील किनवट येथील राष्ट्रीय बिरसा क्रांती दल आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
नांदेड माहूर वन परिक्षेत्राच्या वनमजूर कौशल्याबाई परचाके
यांना आर्थिक मदत मिळावी या करिता दिले निवेदन

राष्ट्रीय आदिवासी बिरसा क्रांती दल या संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरतजी मडावी
यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नांदेड ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष अशोकराव आबाराव सिडाम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नांदेड ग्रामीण जिल्हाअध्यक्ष जितेंद्र अ .कुलसंगे यांच्या नेतुत्व अध्यक्षतेखाली सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय किनवट यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले

नांदेड माहूर वन परिक्षेत्राच्या वनमजूर कौशल्याबाई परचाके या
आदिवासी जमातीच्या महिला वन विभाग नांदेड येथे उपोषणाला बसल्या होत्या दुर्दैवाने 28 ऑगस्ट 2023 रोजी उपोषणादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना आर्थिक मदत म्हणून शासनातर्फे तात्काळ एक कोटी रुपये व त्यांच्या कुटुंबात दोन व्यक्तींना नोकरी द्या तसेच त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा व ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून वनमजुरास न्याय देण्याबाबत अशा आशयाचे निवेदन आज सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालय उपविभागीय कार्यालय किनवट यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती माननीय श्रीमती द्रोपदी मुर्मू यांना बिरसा क्रांती दल संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देण्याकरता
जितेंद्र अनिलराव कुलसंगे जिल्हाअध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड,अशोक आबाराव सीडाम कार्याध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड,बालाजी सिडाम तालुकाध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड,संदीप दत्ता कन्नाके संघटक बिरसा क्रांतीदल नांदेड ,शैलेश मनोहर मेश्राम जिल्हा उपाध्यक्ष बिरसा क्रांती दल नांदेड,आशिष उर्वते राष्ट्रीय क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष नांदेड, रामा लोखंडे तालुका सचिव,बबलू मिरासे, पवन खराटे,संतोष पांडुरंग कनाके किनवट माहूर विधानसभा प्रभारी,प्रणय रमेश कोवे नांदेड ग्रामीण जिल्हा मीडिया अध्यक्ष,मोहन लक्ष्मण कन्नाके मांडवी सर्कल अध्यक्ष,संजय विष्णू पेंदोर माहूर तालुका अध्यक्ष,अशोक नैताम किनवट माहूर संघटक श्रीमती जिजाबाई मेश्राम माजी नगरपरिषद सेविका किनवट,श्रीमती मनीषा चौधरी महिला तालुका संघटक,श्रीमती सुरेखाताई घाटकर महिला तालुकाध्यक्षा,सौ शोभा अनिल कुलसंगे सदस्य,ट्रायबल सेवा न्यूज चॅनलचे स्वीय सहाय्यक रमेश परचाके,सामाजीक चळवळीचे कार्यकरते सुरेश साकपेल्लीवर,आदींची यावेळी उपस्थिती होती

Share This Article
error: Content is protected !!