नायगाव ता प्रतीनिधी/अशोक वाघमारे.
नायगाव : तालुक्यातील वजीरगाव येथे अंतरवाली सराटी येथील अमानुषपणे लाटी चार्ज व नवयुवकावर खोटे गुन्हे दाखल करून समाजाची मोठी फसवणूक केल्याच्या निषेधार्थ म्हणून नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येत जालना जिल्ह्यातील झालेल्या अमानुषपणे लाटी चार्ज केल्याच्या निषेध करून व सकल मराठा समाजाच्या विविध मागण्याकरिता वजेगाव येथील हनुमंत पाटील ढगे हे गेल्या काही दिवसापासून अमर उपोषणाला बसले असता त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याकारणाने त्यांना नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. हनुमंत पाटील ढगे यांनी समाजाच्या विविध मागण्या करिता व समाजावर होणारे सततचे अन्याय अत्याचार यामुळे वजीरगाव येथे अमरण उपोषणाला बसले होते.
सदरील सकल मराठा समाजाच्या विविध मागण्याकरिता व जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथील शासनाच्या व सरकारच्या वतीने अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला असून त्यांच्या निषेधार्थ नायगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण करते गजानन पाटील कदम व सतीश पाटील कदम यांच्या समर्थनाथ दिनांक 11 -9- 2023 रोजी नायगाव शहर चक्काजाम करण्याची निवेदनामार्फत इशारा देण्यात आला आहे. म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने निवेदन देऊन दिनांक 11 9 2023 रोजी नायगाव शहर बंद ला सर्व समाज बांधवांनी प्रतिसाद देऊन सहकार्य करण्याचे देखील आवाहन सकल मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.
सदर मराठा समाज बांधवांच्या मागण्याकरिता नायगाव तहसील कार्यालयासमोर बसलेले उपोषण करते व नायगाव तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन सरकारला मागण्याकरिता विविध प्रकारचे जाब विचारले आहे. सरकारने केवळ मराठा समाजाचा वापर करून मराठा समाजाला खुश करण्याकरिता खोटे आश्वासन देऊन समाजाची मोठी कोंडी करत आहे. समाजातील गेल्या अनेक वर्षापासून ची प्रलंबित मागणी असलेली आरक्षण च्या मागणी करिता राज्यभरातील अनेक युवकांचे जीव गमावले गेले आहेत आणि समाज अजूनही संघर्षाच्या मार्गावर असून समाजातील अनेक नवयुवक हे खोट्या केसेसच्या खाली शिक्षा भोगत आहे म्हणून नायगाव तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी एक संकल्प केला असून की जोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळणार नाही आणि अंतरवाली सराटी येथील जो अमानुषपणे लाटी चार्ज करण्यात आला त्याचे सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी मराठा समाजातील नवयुवकावर खोटे गुन्हे दाखल झालेले ते तात्काळ मागे घेऊन त्यांना निर्दोष पणे सुटका करण्यात यावी अशा विविध मागण्याकरिता सकल मराठा समाज नायगाव च्या वतीने दिनांक 11 9 2023 रोजी बंदची हाक दिली आहे.
मनोज पाटील जरांगे यांच्या समर्थनार्थ कंधार तालुक्यातील पेटवडज येथील दोन उपोषणकर्त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पेटवडज येथील उपोषणकर्त्यांनी तहसीलदार यांना निवेदन करून निवेदनाद्वारे विविध मागण्या देखील करण्यात आल्या आहेत. सदर मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा इशारा देखील सरकारला व प्रशासनाला देण्यात आला आहे.