अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्य समितीवर निवड झाल्यामुळे डाॕ.सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांचेकडुन मा.अशोकराव चव्हाण यांचा सत्कार

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :दि.11.राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्लीच्या अत्यंत महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या ( CWC ) राष्ट्रीय कार्य समितीवर सदस्य म्हणून झालेली निवड म्हणजे राष्ट्रीय नेता म्हणून कार्य करण्यासाठीची पुढील वाटचाल असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डाॕ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे यांनी केले.ते अशोकराव चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी मुद्दाम नांदेड येथे आले असता बोलत होते. याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रफुल सावंत,जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार,अनिल कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी दि.२ व ३ आॕक्टोबर रोजी शिर्डी येथे संपन्न होणार असलेल्या प्रदेश काँग्रेस अनुसूचीत जाती विभागाच्या राज्यस्तरीय शिबीरास श्री अशोकराव चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देऊन विनंती केली असता त्यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले व काही मार्गदर्शनपर सुचना केल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार यांनी जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागाच्या कामकाजात उदभवणार्या अडचणीबाबत चर्चा केली.

Share This Article
error: Content is protected !!