नायगाव येथे चक्काजाम आंदोलनाला सुरुवात व ग्रामीण भागात साखळी उपोषणाला सुरुवात.

abhishek bakkewad
4 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांनी मागील दोन दिवसांपूर्वी दिलेल्या इशारांचा आज नायगाव शहर व ग्रामीण भागात चक्काजाम आंदोलन चालू केले आहे नांदेड हैदराबाद मार्गावर मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाज बांधवांनी एकत्र येत अनेक ठिकाणी चक्काजाम केले असून तर काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा व प्रशासनाचा निषेध केला आहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील हे गेल्या 14 ते 15 दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून त्यांच्या विविध मागण्याकरिता सरकारने याकडे गांभीर्य घेत नसल्याने त्या आंदोलनाचे पडसाद राज्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात उमटले असून मागण्याकरिता व आरक्षणाकरिता सकल मराठा समाज बांधवांनी अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने उपोषणे व मोर्चे काढून सरकारचा निषेध करत आहेत. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ठाम असल्याने त्यांच्या मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत राज्यातील सकल मराठा समाज बांधव हे माघार घेत नाही असा इशारा दिले असल्याने मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मराठा बांधव यांनी नायगाव तहसील कार्यालयासमोर गजानन कदम व सतीश कदम यांनी गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांची तब्येत खालावली असल्याने त्यांना नांदेड येथे हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. यात वजेरगाव येथील हनुमंत ढगे यांनी उपोषणाला बसले असून त्यांची देखील तब्येत खालावली गेली आहे त्यांना देखील नांदेड येथे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून यावर सरकारने त्वरित मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व इतर मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशा मागण्याकरिता नायगाव तालुक्यातील वजेरगाव येथे बहुसंख्येने मराठा समाज बांधव एकत्र येत स्वयं स्फूर्तीने सरकारचा प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
नायगाव शहर चक्का जाम आंदोलन ला तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव यांनी मोठा प्रतिसाद देत. सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा जाहीर निषेध करत तालुक्यातील सर्वच गावातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव एकत्र येऊन चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पिंपळगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य महामार्गावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. गंगनबीड फाटा येथे देखील मराठा बांधव यांनी एकत्र येत राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून सरकारवर घोषणाबाजी सुरू केली आहे.
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षण व इतर मागण्या करिता जालना जिल्ह्यातील अंतर वल्ली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या अनेक दिवसापासून आमरण उपोषणाला बसले असून त्या ठिकाणी स्थानिक पोलीस प्रशासनाने तेथील महिला व युवकावर लाठीचार्ज करून त्यांच्यावर भ्याड हल्ला केल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांचे समर्थन करण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका व कुसनूर, पळसगाव,वजीरगाव, कहाळा, नरसी, खंडगाव, राहेर, गंगनबीड, कुंटूर, घुंगराळा, देगाव, अशा विविध गावांमधून सकल मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले असून सरकारने जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत असेच हमी सर्वच काल मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि आमचे उपोषण असेच पुढे चालू राहणार आहे असे देखील मराठा समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
राज्यातील सकल मराठा समाज यांचा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने राज्यातील मराठा समाज यातील मोठा रोष पाहता मराठा समाज बांधवांनी विविध गावांमध्ये लोकप्रतिनिधींना गावामध्ये न येऊ देण्याचे देखील शपथ घेतली आहे. व जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही सकल मराठा समाज बांधव कुठल्याच राजकीय पक्षाला व राष्ट्रीय पक्षाला मतदान करणार नाही अशी देखील शपथ घेण्यात आली आहे. तर काही ठिकाणी शाळेतील शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील आरक्षण मिळेपर्यंत हमी देखील शाळेमध्ये येणार नाही अशी शपथ घेतली असता यामधून मराठा समाजामध्ये मोठा रोष असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!