नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : जिल्यातील उमरी तालुक्या मधील सिंधी कारखान्यां अंतर्गत यंदा एकरी ७७ टन ऊस उत्पादन करणारे प्रगतशील शेतकरी रमेश भाऊराव पाटील कदम आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पार्वतीबाई रमेश पाटील कदम या शेलगांव ता उमरी यांच्या हस्ते पूजन आणि सपत्नीक सत्कार…
कवळे गुरुजी तुम्ही कितीही कारखाने काढा तुमच्या पाठीशी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचा वरद हस्त आहे चिंता करण्याचे कारण नाही – संभाजीराव पाटील मांजरमकर
सिंधी येथील व्हि.पी.के.उद्योग समूहाचा गूळ पावडर कारखान्याचा आज सातवा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा शेतकरी नेते तथा व्हि.पि.के. उद्योग समूहाचे अध्यक्ष *मारोतराव पाटील कवळे* गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
सदरील बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा प्रसंगी प.पू.यदुबन महाराज मठ संस्थान कोलंबी, प.पू.आनंदपुरी गुरुदत्त पुरी महाराज दत्त संस्थान चोळाखा,आणि संभाजीराव पाटील मांजरमकर,गणपतराव पाटील नांदेकर,आनंदराव पाटील डोनगांवकर,पारससेठ दर्डा प्रतिष्ठीत व्यापारी उमरी,अनिल दर्डा, कांग्रेस कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे,व्यंकटराव पाटील शेलगांवकर,वसंतराव जाधव चेअरमन सेससो वाघाळा, गजानन पाटील बेंद्रीकर, गंगाधर पाटील शेलगांवकर,संचालक प्रभाकरराव पाटील पुयड, संचालक गणेशराव पाटील ढोलउमरीकर, लक्ष्मणराव पाटील हारेगांवकर,दत्ताहरी पाटील हिवराळे,तानाजी पाटील शिंदे,बालाजी डांगे किसान सेल उमरी कांग्रेस तालुकाध्यक्ष, दिनकर भंडारे मागासवर्गीय सेलचे उमरी कांग्रेस तालुकाध्यक्ष,आनंदराव पाटील शिंदे पर्यावरण सेल उमरी कांग्रेस तालुकाध्यक्ष,गोविंद पाटील ढगे यूवक कांग्रेस उमरी तालुकाध्यक्ष, अनिल वडजे नागठाणेकर,डीजी तूपसाखरे, उपसरपंच विलास पाटील नरवाडे सिधिकर,गजु पाटील हसेकर यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.
यावेळी कवळे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले जसे रमेश पाटील कदम यांनी एकरी ७७ टन ऊस उत्पादन केले तसेच आपल्या परिसरातील शेतकरी एकरी 100 टन ऊस काढावा अशी माझी अपेक्षा आहे.येणाऱ्या काळात नक्कीच आपला परिसर सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.यासाठी तुमच्या साथची गरज आहे..नक्कीच शेतकरी माय बाप आपण दोघे मिळून येथे क्रांती घडवू आणि आपला विकास साधून घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
संभाजीराव पाटील मांजरमकर यांनीही आपले विचार मांडले ते म्हणाले कवळे गुरुजी तुम्ही कितीही कारखाने काढा तुमच्या पाठीशी साधू संताचे आशिर्वाद आहेतच त्या बरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांचाही वरद हस्त आहे तुम्हाला कशाचीच चिंता राहणार नाही असे ते म्हणाले यावेळी प्.पू.यदुबन महाराज, यांनीही आशिर्वाद रुपी मनोगत व्यक्त केले.
बालाजी पाटील बोळसेकर, साहेबराव पाटील कूदळेकर, लक्ष्मणराव बाबा शेलगांवकर,यांनीही आपले विचार मांडत यांचे कौतुक केले..
यावेळी साई कृपा दूध डेअरी अँड मिल्क प्रोडक्टचे सी.ई.ओ.परमेश्वर पाटील कवळे, गणेशराव पाटील कवळे, किशनराव पाटील कवळे, आनंदराव पाटील भायेगांवकर, पंजाबराव पाटील कार्लेकर,व्यंकट पाटील सावंत,योगेश पाटील सावंत,नारायण पाटील कदम,राजू पाटील कदम,एकनाथ पाटील कदम,श्रीनिवास पाटील ढगे,नारायण पाटील कवळे,जनार्दन साहेब पिनलवार,बालाजी पाटील बोळसेकर,हणमंतराव पाटील कवळे,गंगाधर देसाई,बाबुराव पाटील कवळे,जनरल मॅनेजर श्रीराम आंबटवार साहेब,शेतकिय अधिकारी पवार साहेब,शेतकीय अधिकारी रफिक साहेब,इंजी.सुमित मस्कले, केमिस्ट् भूक्तरे साहेब यांच्यासह परिसरातील बहुसंख्य शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचलन भास्कर पाटील मनूरकर तर आभार जनसंपर्क अधिकारी उमाजी नादरे साहेब यांनी केले.