विश्वहिंदू परिषदेच्या,दुर्गा वाहिनीचे रक्षाबंधन
उमरखेड ता. प्रतिनिधी / मनोज राहुलवाड
उमरखेड : महिला ह्या पूर्वीपासूनच सशक्त आहेत त्यांना कोणीही कमजोर समजू नये, महिलांनी ठरवले तर कोणतेही मैदान त्या गाजवू शकतात असे गौरउद्गार सुजाताताई बनसोड यांनी दुर्गावाहिनीच्या रक्षाबंधन उत्सवात केले, पोलीस चौकीत दुर्गावाहिनीच्या कार्यक्रमात त्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या,बोलतांना त्या पुढे म्हणाल्या की दुर्गावाहिनीचे कार्य महिलांना राष्ट्रिय प्रवाहात सहभागी करण्याचे आहे,त्या कार्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा,
ढाणकी शहरात नव्यानेच मातृशक्तिची एकत्रीकरण करून विश्वहिंदू परिषद प्रणित दुर्गावाहिनी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती, महिलांना सशक्त करून त्यांच्या हातून राष्ट्रधर्माचे कार्य निरंतर घडत राहो, व संघटनेचे ब्रीदवाक्य सेवा सुरक्षा व संस्कार या ध्येयाने महिलांना कार्यप्रवृत करणे असे या संघटनेचे कार्य आहे, तसेच समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणारे,समाजाच्या रक्षणाचा भार उचलणारे पोलीस बांधव व महिलांवरील अत्याचाराला वाचा फोडणारे पत्रकार बांधव यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दुर्गावाहिनी या संघटनेच्या मुलींनी पोलीस व पत्रकार बंधूंना राखी बांधून हा उत्सव साजरा केला, सर्वात अगोदर ढाणकी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल व ठाणेदार सुजाताताई बनसोड यांना पहिली राखी बांधून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली, ठाणेदार सुजाता बनसोड यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून अनमोल मार्गदर्शन केले,त्यानंतर सर्व पोलीस बंधू पत्रकार बंधू याना राखी बांधून कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमात राखी बांधणाऱ्या दुर्गांना ओवाळणी म्हणून 2200 रुपयांची रक्कम जमा झाली होती, ती ओवाळणी तरुणींना दंड प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येणार असे दुर्गावाहिनीची ढाणकी प्रखंड प्रमुख प्रतीक्षा उपेवाड हिने सांगितले, या कार्यक्रमाला आनंदराव चंद्रे, सुरेश जयस्वाल, ठाणेदार सुजाता बनसोड, बिट जमादार मोहन चाटे, भालेराव साहेब, हाके साहेब, कुसराम साहेब, पत्रकार, उदय पुंडे, नागेश महाजन, प्रफुल्ल चौरे,विलास घोडे, दिगंबर शिरडकर, बंटी फुलकोंडवार ब्रह्मनंद मुनेश्वर ,उपस्थित होते तर प्रतीक्षा उपेवाड, शुभांगी मिटकरे, प्राची सूर्यवंशी, उन्नती आडे, धरती निकम,गायत्री निकम, प्रियांशी ठाकूर, माही चव्हाण,साक्षी नपते, मोक्षा असेवाड, या दुर्गांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले