भारतीय माजी सैनिक संघटना अंतर्गत जय जवान सहकारी पतसंस्थेचा दहावा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

नांदेड प्रतिनिधी/

नांदेड: : हॉटेल सेंट्रल पार्क नांदेड येथे मोठ्या संख्येने सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री रामराव थडके यांच्या अध्यक्षतेखाली झाला. मंचावर विराजमान प्रमुख पाहुणे कर्नल एम रंगाराव ,ऑफिसर कमांडिंग५२ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, ब्रिगेडियर सुमंत दशरथ नि., लेफ्टनंट कमांडर सोपानराव डोके नि. ओआयसी ईसीएचएस. विशेष निमंत्रितमध्ये माजी सैनिक संघटनांच्या समन्वय समितीचे सदस्य श्री लक्ष्मण देवदे, श्री हयुम पठाण, श्री ज्ञानेश्वर डुमणे, श्री प्रवीण देवडे होते. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयचे सुभेदार अर्जुन जाधव उपस्थित होते. कॅप्टन प्रकाश कस्तुरे यांनी प्रस्ताविकात भारतीय माजी सैनिक संघटना ,जय जवान पतसंस्था व जय जवान महिला बचत गट यांच्यातर्फे होत असलेल्या कार्याचा आढावा सादर केला. संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
शहीद प्रफुल्ल गोवंदे  यांची माता व पिता श्री गणपत गोवंदे  तसेच शहीद जळबा जोंधळे यांचे पिता श्री धोंडीबा जोंधळे यांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नांदेड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उपक्रमांच्या माध्यमातून जवानांच्या प्रती आस्था असणारे व मदत करणारे समाजसेवक डॉ. नागेश कल्याणकर , कंधारचे कलाशिक्षक श्री येमेकर, समाजसेवक व पत्रकार इजिं.हरजिंदर सिंघ संधू,दैनिक प्रजावाणीतील मानसी सदरच्या लेखिका डॉ लक्ष्मी पुरणशेट्टीवार सौ माया पार्डीकर प्रा.संगीता स्वामी आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कर्नल एम रंगाराव यांनी पतसंस्थेचे संचालक मंडळाचे कौतुक केले. नांदेड मध्ये सीएसडी कँटीन सुरुवात करण्याच्या प्रयत्ना बद्दल आश्वासन दिले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांनी देखील जिल्ह्यातील माजी सैनिकांची प्रश्न सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. लेफ्टनंट कमांडर सोपानराव डोके यांनी ईसीएचएस सेवा बद्दल आश्वासन दिले
*संघटनेचे सचिव श्री देवराव झगडे* यांनी उपस्थितांना कौटुंबिक निवृत्तीवेतन मंजूर होणे बाबत येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात श्री रामराव थडके यांनी जिल्ह्यातील माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र करण्यासाठी होत असलेल्या या संस्थांच्या माध्यमातून प्रयत्नांची माहिती दिली व सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन केले.तसेच माजी सैनिक संघटनांच्या समन्वय समितीच्या सदस्यांना विनंती केली की सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केल्यास सर्व प्रलंबित प्रश्न सुटू शकतील यावेळी अध्यक्षानीब्रिगेडियर सुमंत दशरथ साहेबांना नांदेड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारण्याची मागणी केली व त्यांनी मागणी मान्य केली
श्री ज्ञानेश्वर डुमणे यांनी आभार मानले.श्री अन्वर भाई यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकारणी सदस्य प्रकाश कस्तुरे, उत्तम कदम, केशव मुंडे ,पांडुरंग सावंत, संजय जाधव आदींचा सिंहाचा वाटा आहे.
स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share This Article
error: Content is protected !!