आरक्षणासाठी चिलपिंपरी येथे काढली सरकारची अंत्य यात्रा.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

 

मुदखेड प्रतिनिधी राहुल कोलते

मुदखेड : मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी येथे सरकार आरक्षणाला विलंब करीत असल्यामुळे सरकारचा जाहीर निषेध म्हणून सकल मराठा व समस्त मराठा बांधव यांनी काढली सरकारची अंत्ययात्रा. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषणाला बसले असतानां पोलिसांनी आंदोलन कर्त्यावर लाठीमारायच्या निषेधार्थ सकल मराठाच्या वतीने मुदखेड तालुक्यातील मौजे चिलपिंपरी गावात दि.१२ सप्टेंबर रोजी सकल मराठा व मराठा बांधव यांच्यावतीने आरक्षणाला विलंब लावणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध म्हणून सरकारची अंतयात्रा मौजे चिलपिंपरी मध्ये काढण्यात आली. ही अंत्ययात्रा गावातील प्रमुख रस्त्याने वाजत गाजत. “एक मराठा लाख मराठा”. “आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं” ‘आरक्षण कोण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही ‘ अशा घोषणा देत सरकारची अंत्ययात्रा गावातून स्मशानभूमी कडे नेऊन सरकारचा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी सकल मराठा संघ समस्त मराठा बांधव, महिला भगिनी, गावकरी मंडळी आदी उपस्थिती होते.

Share This Article
error: Content is protected !!