नांदेड महाराष्ट्र सह पर राज्यातील पी जी आर सह बोगस कंपन्यांचा सुळसुळाट

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

शेतकऱ्यांची होणारी दिशाभूल व लूट खपवून घेणार नाही

पिजीआर च्या नावाखाली शेतकऱ्याची होणारी अमाप लूट थांबवा…गजानन पा.चव्हाण

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड : भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून जगात ओळखल्या जाते कारण येथे 70 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत पण त्यांना लुटण्यासाठी कोण कोण येते आणि लुट करून जाते हे नवीन नाही परंतु सद्यस्थितीत पी जी आर अर्थात पीक संवर्धन उत्पादने या नावाखाली शेतकऱ्याची अमाप लुट होत आहे ती तात्काळ थांबवावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे असा इशारा सामाजिक तथा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व सक्रिय कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे कडक शब्दात इशारा दिला आहे.

वृत्त असे की,अनेक समस्यांनी त्रस्त असलेले शेतकरी हे केले तर काय होईल ते केले तर जास्तीचे उत्पादन निर्माण होईल काय ही त्यांची भावना असते हाच फायदा उठवून पी जी आर कंपनी या नावाने बोगस केमिकल विकत आहे तसेच नायगाव तालुका कृषी अधिकारी हे झोपा काढत आहेत का हे नाकारता येत नाही.

याबाबत शासनाने यांना परवानगी दिली किंवा नाही हे मात्र अद्याप माहित नाही परंतु चड्या दराने हा पी जी आर विक्री केला जात आहे याबाबत कृषी क्षेत्र व जिल्हा परिषद अधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत उडवा उडविचे उत्तरे देतात तेव्हा लक्षात येते की,सरासपणे ही कंपनी बोगस आहे या कंपन्यांचे जाळे नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात व पर राज्यात देशात पसरत आहेत.

या बोगस कंपनीचा परवाना रद्द करून त्या संबंधित कंपनी धारका विरुद्ध फौजदारी कारवाई करावी असा खरमरीत इशारा नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते गजानन पाटील चव्हाण यांनी दिला आहे तर शेतकऱ्याच्या खरच हितासाठी की लुबाडण्यासाठी सदर कंपनीचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि शेतकऱ्याच्या नावाने चालणारे कृषी क्षेत्र कार्यालय हा देखावा आहे कारण येथील जिल्हा परिषद कृषी अधिकारी कायमस्वरूपी दौऱ्यावर राहतात असाही निवेदनाद्वारे प्रश्न चव्हाण यांनी केला आहे तर या बोगस कंपन्याचा परवाना तात्काळ रद्द करावा संबंधित आणि पी जी आर या कंपनी चालका विरुद्ध कडक व ठोस कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने अमरण उपोषण करण्यात येईल काही विपरीत घडल्यास सर्व जबाबदार कृषी विभाग राहील अशा इशारा गजानन पाटील चव्हाण यांनी निवेदनाद्वारे दिलेला आहे.

Share This Article
error: Content is protected !!