लहान शी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची केली नराधम बापाने केली हत्या ….
जामनेर ता.प्रतिनिधी/ शिवाजी जाधव
जामनेर : आधी दोन मुली, त्यात तिसरीही मुलगी झाल्याने बापाने आठ दिवसांच्या चिमुरडीच्या तोंडात तंबाखू देऊन तिची हत्या केल्याची घटना हरिनगर तांडा येथे उघडकीस आली आहे. एवढेच नाही त्या नराधम बापाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावलेली होती.
झालेला प्रकार आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा उघडकीस आला असून
हत्यारा बापाला पोलिसांनी आज रोजी अटक केली आहे.
ही घटना जामनेर तालुक्यातील हरिनगर तांडा येथे रविवारी उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालक्यातील हरीनगर तांडा येथील गोकुळ गोटीराम जाधव (वय ३०) असे या नराधमाचे नाव आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोद जवळ हरिनगर तांडा ता. जामनेर येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली होत्या.व शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगीच जन्माला आली.
रविवार, दि१० रोजी चिमुरडीची गोकुळने हत्या केली.
पंरतू या मुलींची नोंद करायला आशा सेविका गोकुळच्या घरी गेली असता, त्यावेळी तिसरी मुलगी तिथे नव्हती. आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत हे मंगळवारी गावात पोहोचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली.
गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू दिला. तिला झोळी झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न आले आहे.यावेळी हत्यारा पिता गोकुळ जाधवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.