विविध मागण्यांसाठी लोकस्वराज्य आंदोलनाचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर प्रचंड एल्गार महामोर्चा….

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेडजिल्हा प्रतिनिधी/

नांदेड : लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने विविध मागण्यांसाठी
छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शनिवार,दि. १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२:०० वाजता प्रचंड एल्गार महामोर्चा काढण्यात येणार आहे.अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नामदेव गायकवाड यांनी दिली आहे. लोकस्वराज्य आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे सर नांदेड हे मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.मोर्चामध्ये मातंग समाजातील सेवानिवृत्त कर्मचारी बांधव, कामगार,महिला,पुरुष, युवक,रिक्षाचालक,हमाल,माथाडी कामगार,ड्रायव्हर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणारआहे.सदर मोर्चास क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात होईल.
संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करा, अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड वर्गीकरण करा,जातीयवादी मानसीकेतून दलितांवरील वाढत्या अन्याय-अत्याचारांना पायबंद घाला, मातंग समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी विनातारण १० लाखांचे कर्ज वाटप करा,डॉ.अण्णा भाऊ साठे महामंडळाचे भाग भांडवल वाढवा आदी मागण्या घेऊन हा मोर्चा मंत्रिमंडळ बैठकीवर धडकणार आहे.
या माेर्चात समविचारी संघटनेचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्तेसह नांदेड,परभणी,हिंगोली, लातुर,बीड,उस्मानाबाद,जालना औरंगाबाद जिल्ह्यातील तमाम समाज बांधवांनी मोठ्या संख्येने नांदेड रेल्वे स्थानका वरुन येणाऱ्या विविध जलद एक्सप्रेस,पॅसेंजर गाड्यानी निघून उपस्थित राहावे,असे आवाहन प्रदेशाध्यक्ष नामदेव गायकवाड,प्रदेश सचिव-अँड नितीन पौळ,प्रा.पी.डी. गोणारकर,रावसाहेबदादा पवार, प्रा.बी.आर.पारस्कर,व्ही.जी.डाेईवाड, दशरथ मानवतकर,जिल्हाध्यक्ष
अतुल खंडगावकर,अँड सचिन बोईवार,गणेश तुपे,नागेंद्र वाघमारे, नागेश पवार,नागोराव नामेवार,डी.एन.शेळके,एन.जी. पोतरे,बालाजी पाटोळे, प्रा.इरवंत सूर्यकार,रा.ना.मेटकर,एकनाथ रेडे, संतोष तेलंग,अर्जुन गायकवाड मालेगांवकर,संजय खानजोडे, नागोराव कुडके,पंडितअण्णा वाघमारे, संभाजीराजे वाघमारे,अंकुशदादा गायकवाड,बाळासाहेब टिकेकर डौरकर,माणिक कांबळे बारडकर,कैलास सुर्यवंशी,सचिन वाघमारे,नागोराव कमलाकर,पिंगळे, नारायण ईबीतवार,यादव कुडकेकर, बी.एम.गोणारकर,लक्ष्मण निदानकर, संदीप मेटकर,सुनील जाधव,देविदास सुर्यवंशी,दिनेश सूर्यवंशी,पुजा मोरे, गंगासागर टोम्पे,गंगाधर सिंदलोन, गंगाधर गायकवाड,राजु गायकवाड मंडाळेकर,साहेब गव्हाणकर,राजु झुंजारे,पी.जी.केदारे, साईनाथ जळपतराव,धोंडोपंत बनसोडे,नागेंद्र गायकवाड,मारोती दर्शनकर,शिवराज केदारे,चांदराव पोतरे,गोविंद जोंधळे आंबेगावकर,आनंदराव जळपते, दिगांबर गायकवाड,शामराव गुंडेकर, सदानंद ऐरणकर,करण आंबेकर, रामदास जळपते,अशोक जळपते आदींनी केले आहे.

Share This Article
error: Content is protected !!