विशेष नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे
नायगाव : तालुक्यातील कुंटूर सर्कल अंतर्गत येणारे मौजे हुस्सा येथे सर्जा राजाचा आनंदाचा सण मानला जाणारा पोळा हा अतिशय शांततेत पार पडला आहे. पोळा हा सणाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मौजे हुस्सा येते अतिशय शांततेत सर्जा राजाची गावातील हनुमान मंदिर परिसरात व मंदिराच्या भोवती बैलांना मिरवीत सण साजरा करण्यात आला आहे.
सदर पोळा हा सण माननीय जिल्हाधिकारी यांनी काढलेले निर्देश यांचे पालन करून व गावातील कुठल्याही जनावराला लंम्पिचे आजार नसल्याचे खात्रीलायक माहिती करून गावकऱ्यांच्या समवेत व सर्वांमध्ये साजरा करण्यात आला आहे. सुधार बैलांच्या मिरवणुकीत गावातील सर्व शेतकऱ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत हा सण साजरा करण्यात आला आहे.या बैल मिरवणूकीत गावाकऱ्यांनी स्वयं स्फूर्तीने एकत्र येत गावातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळाले आहे. या पोळा सणात गावातील मानकरी गोविंद कमलकिशोर पाटील हंबर्डे यांच्या हस्ते तोरम तोडण्यात आले आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित गावातील मोठ्या प्रमाणात शेतकरी व मजूर वर्ग आणि गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.