गावठी बॉम्बचा स्फोट;भाविक जखमी!

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love
  1. श्री दत्त शिखर संस्थान ते श्री अनुसया माता संस्थान च्या मध्ये असलेल्या पायऱ्यांवर गावठी बॉम्बने खळबळ

डुक्कर मारण्यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या गावठी बॉम्ब देवस्थानच्या पायऱ्यावर आढळल्याने घबराहट

माहूर तालुका प्रतिनिधी
विजयसिंह हजारी
माहूर : माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान ते अनुसया माता संस्थान कडे जाणाऱ्या रस्त्यावरील संस्थांकडून बांधण्यात आलेल्या पायऱ्यावरून अनुसया माता मंदिराकडे दर्शनासाठी जात असलेले नामदेव उमाजी वानोळे वय 78 वर्ष राहणार सावरगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड यांना पायऱ्यावर विचित्र गोळ्या सारखी वस्तू दिसल्याने त्यांनी हातात घेऊन पाहणी करत असताना त्या वस्तूचा स्फोट झाल्याने त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा व बोट मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 30 रोजी सकाळी आठ वाजता घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे
शहरात तणाव पूर्ण शांततेचे वातावरण असताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असताना देवस्थानवर हजारो भाविक येत असतात त्यांना वाहने उपलब्ध होत नसल्याने बहुतांश भाविक दर्शनासाठी सर्व मंदिरावर पायी जातात हदगाव येथील नामदेव वानोळे हे श्री दत्त शिखर संस्थांनचे दर्शन घेऊन पायऱ्याद्वारे अनुसया माता मंदिराकडे जात असताना पायऱ्यावर त्यांना काळा गोळा सदृश्य वस्तू दिसल्याने त्यांनी ती हातात घेऊन पाहणी करत असताना त्या वस्तूचा अचानक स्पोठ झाल्याने त्यांच्या डाव्या हाताचे अंगठा आणि बोट जखमी होऊन कायमस्वरूपी निकामी झाले आहे स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने येथील श्री चिंतामण भारती महाराज यांचे सह भाविकांनी घटना स्थळाकडे धाव घेऊन जखमी वानोळे यांना ग्रामीण रुग्णालयाची ॲम्बुलन्स बोलावून ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रथमोपचारासाठी दाखल केले
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सदानंद शिंनगारे पोलीस निरीक्षक नितीन काशीकर सपोनी श्रीधर जगताप सपोनी संजय पवार यांचे सह पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली असता तो स्फोट डुक्कर मारण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या गावठी बॉम्बचा असावा असा अंदाज व्यक्त केला असून घटनेची माहिती वरिष्ठांना कळविण्यात आलेली आहे जखमी वानोळे यांना उपचारार्थ नांदेड येथे पाठविण्यात आलेले आहे गोरक्षक हल्ला प्रकरणी माहूर शहरात शांततापूर्ण तणावाचे वातावरण असताना सर्वात मोठे धार्मिक स्थळ असलेल्या माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थान येथे बॉम्बस्फोट सारखी घटना घडल्याने शहरातील नागरिकासह आलेल्या भाविकांत घबराटीचे वातावरण असून पोलिस सदर प्रकरणी तपास करत आहेत

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!