मुदखेड प्रतिनिधी/ राहुल कोलते
मुदखेड : दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या हर्ष उल्हासात व विविध उपक्रमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिलपिंपरी येथे संपन्न झाला.
याप्रसंगी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शालेय गणवेश व बूट आणि सॉक्स चे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री चंद्रकांत घोडगे, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शेख नूर, यशवंत महाजन, विष्णुकांत शिंदे, दौलत मॅडम यांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भीमराव गाढे, माधव गाढे, ज्ञानेश्वर गाढे,सरपंच सुशिलाबाई कोलते, उपसरपंच दत्तराम गाढे, पत्रकार राहुल कोलते, युवा सेना तालुकाध्यक्ष शिवाजी गाढे, पंढरी गाढे, लालजी गाढे, गोविंद गाढे, पुंडलिक गाढे, राजू गाढे, व इतर बहुसंख्य युवक नागरिक उपस्थित होते.