ग्रामीण रुग्णालय येथे क्षय रुग्णांना फुड बास्केटचे वाटप

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

भोकर ता.प्रतिनिधी/

भोकर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत कम्युनिटी सपोर्ट टू टी बी पेशंट उपक्रमात क्षयरोग विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना मोफत पोषण आहार देण्यात येत असून यासाठी क्षयरोगाचा उपचार घेत असलेल्या व संमती दिलेल्या क्षय रुग्णांना पोषण आहार ‘ फुड बास्केट ‘ व इतर आवश्यक मदत ज्यांना द्यावयाची आहे अशांनी संपर्क करून निश्चय मित्र बनावे असे आवाहन आरोग्य विभाग नांदेड तर्फे करण्यात आले आहे .
जिल्हा क्षयरोग केंद्र नांदेडच्या माध्यमातून कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट उपक्रमा अंतर्गत उपचार घेत असलेल्या व संमती दिलेल्या क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी , दानशूर व्यक्तिमत्व ,उद्योग समूह, बँक व विविध संस्था आदींच्या माध्यमातून निक्षय मित्र संबंधितास बनवून यांच्या सढळ हस्ते फूड बास्केट म्हणून एका क्षयरुग्णास एक महिन्यासाठी पूरक पोषण आहार द्यावयाचे असते जेणेकरून औषधोपचार घेत असताना त्यास योग्य तो पोषण आहार भेटावा व तो क्षय मुक्त व्हावा या हेतूने फुड बास्केट तयार करण्यात आले असून या उपक्रमात अधिकाधिक व्यक्तींनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून आजच्या एक दिवसीय मोहिमेत सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष सूर्यवंशी, डॉ सौ नीना बोराडे, डॉ. सौ .विद्या झिने ,डॉ संगीता गादेवाड , डॉ मिरदुडे आदी अधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत आज १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दोन क्षय रुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले. डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक, डॉ बालासाहेब बिर्‍हाडे, डॉ. सागर रेड्डी, डॉ राजाराम कोळेकर यांनी क्षय रुग्ण यांना दत्तक घेवून फूड बास्केटचे वाटप केले. यावेळी आरोग्य सहाय्यक सत्यजीत टिप्रेसवार, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बालाजी चांडोळकर, अत्रिनंदन पांचाळ, मनोज पांचाळ, औषध निर्माण अधिकारी गंगामोहन शिंदे, मल्हार मोरे, संदीप ठाकूर, गिरी रावलोड, झाहेद अलि क्षयरोग विभाग एसटीएलएस विजय क्षीरसागर, संतोष तळपते, आरोग्य कर्मचारी पांडुरंग तम्मलवाड तसेच सर्व स्टाफ उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
error: Content is protected !!