नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड : तालुक्यातील सोमेश्वर येथे आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी वार बुधवार सायंकाळी साडेपाच वाजता जिल्हा परिषद शाळा सोमेश्वर येथे भेट देऊन शाळेतील भौतिक सुविधाची पाहणी केली त्यात शालेय पोषण आहार किचन शेड तसेच सर्व वर्ग खोल्यांची पाहणी करण्यात आली तसेच परिसर स्वच्छ पाहून समाधान व्यक्त केले शाळेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या यावेळी शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर,उपजिल्हाधिकारी कुलकर्णी सर,उपशिक्षणाधिकारी बनसोडे ,पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार,पोलीस पाटील सोमाजी बोकारे,पत्रकार आनंदा बोकारे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठलराव बोकारे, आनंदराव बोकारे,शिवाजीराव बोकारे यांच्यासह पालक समिती मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्याध्यापक मारुती जायभाये नागनाथ पाटील प्रणिता कोडगीरवार प्रशांत हिरेमठ परिसराची स्वच्छता संकुल व परिसराची पाहणी केली व सोमेश्वर येथील शाळेचे व गावकऱ्यांचे समाधान व्यक्त केले.