लोहगाव येथे शेतकऱ्यांना ड्रोन द्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

प्रात्यक्षिक पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड :दि.22.जिल्यातील सगरोळी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने ग्रामीण युवक शेतकरी व शेतकरी महिला कमी वेळात आणि दर्जेदार फवारणी करण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून इलेक्ट्रिक ड्रोन तयार केले असून त्या ड्रोनच्या प्रात्यक्षिक बुधवारी कृषी विज्ञान केंद्र सगरोळीचे यांत्रिकीकरण विभागाचे डॉ.प्रियंका कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहगाव येथील श्री हानमंत रामा वसमते यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाच्या ड्रोन च्या माध्यमातून फवारणी करण्यात आली ड्रोनच्या वापरामुळे इंधनाचे आणि वेळेचे बचत होते तसेच खर्चही कमी होतो असे मत डॉक्टर प्रियंका कोल्हे यांनी व्यक्त केले ड्रोन द्वारे कीटकनाशक फवारणीचे प्रात्यक्षिक लोहगाव येथे घेण्यात आले.

उपस्थित शेतकरी महिलांना दाखवून सध्या भाडेतत्त्वावर केवीके सगरोळी यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे डॉक्टर प्रियंका कोल्हे यांनी आपल्या मनोगतामधून शेतकऱ्यांना सांगितले शेतकरी उत्पादन कंपनी 75 टक्के सबसिडीवर हे ड्रोन मिळणार असल्याचे डॉक्टर प्रियंका कोल्हे यांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले व शेतकऱ्यांना 40% अनुदानामध्ये हा ड्रोन घेता येतो यावेळी उपस्थित ड्रोन कंपनीचे कर्मचारी सुद्धा व शेतकरी संतोष भक्तापुरे रामतीर्थकर त्यानंतर माधव चिंतले टाकळीकर, बाबुराव माळी,विश्वंभर सेटकर, मारुती वसमते,गजानन चिंतले ,हनुमंत वसमते,शिवानंद शेटकर,बाबू चिंचोले पिंटू वानोळे, शंकर पाटील,सयाजी बाऊलगावे, रमेश वसमते,मधुकर वसमते, सुधाकर वसमते,बालाजी शेटकर,नागनाथ वानोळे,व या कार्यक्रमाचे आयोजन बसवेश्वर कृषी गटाचे अध्यक्ष मनोहर वसमते,शिवाजी पांढरे,यांनी कार्यक्रमाच्या आयोजन केले होते.मोठ्या प्रमाणात त्या भागातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Share This Article
error: Content is protected !!