शांताबाई खंदारे यांचे विज पडून दू:खद निधन! आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी कूटूंबीयांना दिली भेट.

abhishek bakkewad
1 Min Read
Spread the love

हिमायतनगर ता.प्रतिनिधी/ बाबाराव जरगेवाड

हिमायतनगर – शांताबाई पुंजाराम खंदारे यांचा विज पडून जागीच मृत्यू झाला आहे.मौजे तालुक्यातील एकंबा गावातील अल्प भूधारक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आहे.आज दिनांक 29रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आणि याच वादळी वाऱ्यामुळे शांताबाई पुंजाराम खंदारे यांचा वर विज पडली आणि त्याच्या शेतात जागीच मृत्यू झाला.
यावर्षी शेतकरी आदीच हवालदिल झाला आसून अनेक संकटांना सामना करावा लागत आहे.मौजे एकंब्यात शांताबाई च्या जाण्याने संपूर्ण शौककळा पसरली आहे.
संबंधित घटनेची माहिती एकंबा गावचे तंटामुक्त अध्यक्ष श्री दत्ता भाऊ कोंकेवाड यांनी लोकतंत्र न्युज लाईव्ह ला दिली आहे.
तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांनी खंदारे कूंटूंबाचे भेट देऊन सांत्वन केले व मी पूर्णपणे आपल्या दूखात सहभागी असून आपल्याला मदत मिळण्यासाठी पुर्णपणे कटिबद्ध आहे आशी त्यांना गव्हायी देली आहे.
शांताबाई पुंजाराम खंदारे यांना पती, तिन मूले,दोन मूली नातू पंतू आसा मोठा परीवार आसून संतोष खंदारे हे त्यांचा मोठा मुलगा आहे.

Share This Article
error: Content is protected !!