बीड जिल्हा प्रतिनिधी/
बीड – परळी शहरांमध्ये क्रीडा संकुलन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवा काँग्रेसच्या वतीने क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे करण्यात आली असून परळी मध्ये क्रीडा संकुलन नसल्यामुळे विद्यार्थी व तरुणांसाठी या क्षेत्रामध्ये आपलं करियर पारंगत करण्यासाठी इतर शहरांमध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जावं लागतं. विद्यार्थी व तरुणांची फरफट होऊ नये यासाठी परळी येथे क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं करियर व भविष्य घडवण्याच्या साठी परळी शहरांमध्ये क्रीडा संकुल उभारून या भागातील विद्यार्थी व तरुणांसाठी त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी संकुलनाला तात्काळ मंजुरी देण्यात यावी.अशी आपणास राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्याकडे लेखी निवेदन करण्यात आली असून याप्रसंगी क्रीडामंत्री निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर शेजुळ, शहराध्यक्ष फिरोज सय्यद,उपाध्यक्ष वृक्षराज काळे, युवक नेते सोमनाथ भोसले, रघुनाथ मुंडे, गोविंद काळे, महादेव काळे ,आकाश जाधव, नंदकिशोर नवले यांसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.