नायगाव तालुक्यासह धर्माबाद उमरी बिलोली मुखेड तालुक्यातील सोयाबिन पिकावर यलो मोझॅक व्हायरसचा सिरकाव

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नांदेड प्रतिनिधी / अशोक वाघमारे.
नांदेड : जिल्ह्यातील उमरी धर्माबाद नायगाव बिलोली मुखेड सह विविध तालुक्यात सोयाबीन पिकावर येलो मोजॅकचा प्रादुर्भाव पाहण्यास मिळत आहे या येल्लो व्हायरस मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये मोठी घट व उत्पादनात लक्षणीय घट होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या वर्षी दुहेरी संकट असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी येलो मोझक चा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात येतील का असे प्रश्न आता शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित होताना दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून यावर्षी एन पेरणीच्या वेळी पावसाअभावी पेरणी लांबणीवर पडली होती. तसेच मध्यँतरी देखील पावसाने दांडी मारल्याने सोयाबीन पिकाला अपेक्षित मालधारणा झाली नाही. आणि पावसाच्या अनियमितपणा व वातावरणातील बदलामुळे आता सोयाबीन पिकावर येल्लो मोझकचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे . यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे सांगण्यात येत आहे यंदाच्या वर्षी पावसाने उघड झाप केल्याने पिकांची वाढ कसेबसे झाली असून यात असे व्हायरस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिसून आल्याने शेतकरी राजा पुन्हा संकटात पडल्याचे दिसून येत आहे.
सदर येलो मोझक व्हायरस मुळे सोयाबीन हे पीक पिवळे पडले असून त्यांच्या शेंगावर काळे ठिपके व फुल उमगताच चरखा बसला असून कवळे फुल गळून पडले आहेत व या व्हायरसमुळे सोयाबीन पिकाचे पाने देखील घडून पडत आहेत (पानझडी ).
या येल्लो मोजॅकचा सोयाबीन पिकावर व उत्पादनावर मोठा परिणाम पडणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा मोबदला व शासनाकडून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी येल्लो मोझकच्या व्हायरसचे महसूल मंडळ निहाय सर्वेक्षण करण्यात येतील का आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सरकार बाहेर काढेल का अशी चर्चा शेतकऱ्याकडून जोर धरत आहे.
सदर सोयाबीन पीक कापणीच्या ऐनवेळी असे येल्लो मोजक चा व्हायरस प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावून घेतल्या इतपत दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!