राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत घव-घवीत यश..
मुदखेड प्रतिनिधी /राहुल कोलते
मुदखेड – (व्ही.आर.गाढे यांच्या कडून) विभागीय कुस्ती स्पर्धेतील अभुतपुर्व यशानंतर आता राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत, *कृष्णा मा.व उच्च मा.विद्यालय सिंधी शाळेतील विद्यार्थ्यांनी घव-घवीत यश संपादन केले आहे.*
राज्यस्तरीय शालेय क्रिडा प्रकारात तब्बल चार विद्यार्थ्यी चमकले ते पुढील प्रमाणे आहेत.
*➖आदित्य शिवाजी ताटे. 17 वर्षाखालील मुले याप्रकारात 50 कीलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत राज्य स्तरावर प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक मिळविले.आणि आता त्याची निवड राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी झालेली आहे.*
➖ राजलक्ष्मी विलास रोकडे हिने 43 कीलो वजनी गटात तृतीय क्रमांक मिळवित कांस्य पदक मिळविले.
➖ धनश्री ब्रह्मदेव नवलव ५३किलो वजनी गटात हिने तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवीले.
➖कु. दुर्गा राजू नाईक हिने 14 वर्षाखालील मुली या प्रकारात 50 किलो वजनी गटात राज्यावर तिसरा क्रमांक पटकावत तीने काश्यंपदक मिळवले.
” क्रिडा स्पर्धेतील कुस्ती पटुंचे यश आमच्यासाठी गौरवास्पद आहे.यामुळे शाळेची व गावाची मान अभिमानाने उंचावली आहे.मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभीनंदन करतो व पुढील क्रिडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो.”
अशा शब्दांत *संस्थेचे अध्यक्ष माननीय गोविंदरावजी पा. सिंधीकर साहेब* यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या…
याचबरोबर पंजाबराव पा. कवळे,श्रीधर पा. कवळे(RFO), निखिल पा. कवळे, ॲड. संदीप पा. कवळे सिंधीकर परीवार व गावकरी मंडळी यांनी मुख्याध्यापक तथा क्रीडाशिक्षक पवळे डी. के. उच्च मा.विद्यालयाचे शिक्षक मुळे आर. डी. व्ही.आर. गाढे तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सर्व कुस्ती पटुंचे खूप-खुप अभिनंदन केले. आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या सर्वांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो हिच सदिच्छा……!!