आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांना तालुक्यात ओळखले जातात
हिमायतनगर ता.बाबाराव जरगेवाड 95453453
हिमायतनगर – काँग्रेस पक्ष पदाच्या निवडी चालू आसतांना हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी श्री गजानन सुर्यवंशी सर यांची निवड नूक्तीच तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या सुचनेनुसार माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष गोविंदराव नागेलिकर यांनी निवड केली असून,या पदानंतर तालुक्यात यूवक ता अध्यक्ष पद रिक्त आहे.
युवक तालुकाध्यक्ष पदासाठी अनेकांनी इच्छा व्यक्त केल्या आसलेतरी या पदासाठी तालुक्यातील अनेक वाटसप गृप, फेसबुक पेज इंस्टाग्रामवर सद्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असणारे दत्ता भाऊ कोंकेवाड एकंबेकर यांच्या नावाची चर्चा होतांना दिसत आहे.
दत्ता भाऊ कोंकेवाड यांचे कार्य तालुक्यात सर्वश्रूत आहे.हे मौजे एकंब्याचे अनेक वर्षांपासून तंटामुक्त समितीचे बिनविरोध अध्यक्ष आहेत.ते नेहमी समाज कार्यासाठी आग्रही असतात, एकंदरीत पाहता ते एक प्रकारचे आजात शत्रु असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत.ते त्यांच्या गावातील कोठल्याही प्रकारची भांडण तंटा पोलिस स्टेशन ला न जाऊ देता सामोपचाराने सोगवण्यात आग्रही असतात.
तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांना तालुका ओळखतो.
त्यांच्या नावांना अनेक ठिकाणी वाव मीळत आहे.या विषयावर त्यांच्या शी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता.मि इच्छुक आहे परंतु आमचे दैवत, आदरनीय आमदार साहेब जी जबाबदारी देतील ते मी पुर्ण पणे स्विकारेण व पक्ष वाढीसाठी स्वताला झोकून कार्य करेल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.