जळकोट तालुका प्रतिनिधी :- ओमकार टाले
जळकोट – प्रहार दिव्यांग संघटना जळकोट च्या वतीने दिव्यांगाच्या विविध मागण्या योजना व हक्क मिळत नसल्यामुळे आज दिनांक 9 ऑक्टोंबर रोजी गट विकास अधिकारी व प्रशासनाची दिव्यांगाने तिरडी यात्रा काढून निषेध करण्यात आला.
जळकोट तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत येथील दिव्यांग निधी वाटप करण्यात यावी, दिव्यांग नोंदणी, दिव्यांग नवीन अडथळा रॅम्पचे बांधकाम करण्यात यावे, पंचायत समिती कार्यालयातील दिव्यांग मदत केंद्र शासन परिपत्रकानुसार दिव्यांग मदत केंद्र चालू करण्यात यावे आधी सह विविध योजना दिव्यांग चे हक्क मागणीसह चार तास आंदोलन करण्यात आले.
जळकोट पोलीस स्टेशन समोरील पंचायत समितीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरून तिरडी आंदोलनाची सुरुवात करण्यात आली ही तिरडी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गट विकास अधिकारी यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
या नंतर गटविकास अधिकारी यांनी दिव्यांगाच्या मागण्या पुर्ण केल्या जातील असे लेखी पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरते माघार घेण्यात आले.
असी माहिती पत्रकारांशी बोलताना प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष माधव होणराव यांनी दिली.
यावेळी माधव होनराव तालुका अध्यक्ष प्रहार नामदेव केंद्रे तालुका उपाध्यक्ष अर्चना पाटील महिला तालुकाध्यक्ष सुनीता चव्हाण महिला तालुका उपाध्यक्ष विनोद तेलंगे प्रहार जिल्हा उपाध्यक्ष बंडेप्पा पडसलगे जिल्हा प्रवक्ता सूर्यभान चिखले जळकोट उदगीर विधानसभा अध्यक्ष रविकिरण बेळकुंदे उदगीर तालुका अध्यक्ष महादेव मोती पवळे उदगीर शहराध्यक्ष संदीप पवार उदगीर तालुका उपाध्यक्ष सुदर्शन सूर्यवंशी उदगीर तालुका सरचिटणीस अभय कुलकर्णी ,प्रतिभा परीट महिला शाखा अध्यक्ष यास्मिन बागवान आशाताई शेवटे, सूरेखा राऊतराव,भागेश्री देवशेटवार, विश्वनाथ वाघमारे चंदर सोमवंशी विठ्ठल माने बालाजी राजगुरू तुकाराम सूर्यवंशी पांडुरंग वाघमारे सोपान वाकडे स्वप्नील परगे जनार्दन घुळे, सटवा कसबे आधीसह तालुक्यातील हजारो दिव्यांग उपस्थित होते