हिमायतनगर ता./बाबाराव जरगेवाड
हिमायतनगर – फुलेनगर येथील प्राथमिक शाळा येथे माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश (1) भोकर श्री आर.डी गाडवे यांनी भेट देऊन शालेय परिस्थितीचा आढावा घेतला त्यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपंचायत संगेवार मॅडम यांनीही नागरिकांसोबत संवाद साधला यावेळी उपस्थित नागरिकांना सन्माननीय न्यायाधीश महोदय यांनी स्वच्छतेचे महत्व सांगितले तसेच श्रमदानातून स्वच्छता हे उत्तम कार्य असल्याचे सांगितले
तेंव्हा नागरिकांनी त्यांना प्रतिसाद देऊन लगेच शाळा परिसराच्या आजू बाजू स्वच्छता केली
उपस्थित नागरिकांनी प्रशासक मॅडम यांना फुलेनगर येथील मूलभूत सुविधा बाबत चर्चा केली प्रशासक मॅडम यांनी प्रामाणिक पने आपल्या समस्यांकडे लक्ष देऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले यावेळी उपस्थित नगरपंचायतचे मुख्याधिकारी ताडेवाड साहेब गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य तसेच सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ पाटील साहेब भाग शिक्षणाधिकारी अरुण पाटील साहेब मुख्याध्यापक कोमलवाड मॅडम व कंधारकर मॅडम आणि शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहम्मद इम्तियाज (बाबा खान ) सामाजिक कार्यकर्ते सुभाष दारवंडे ज्येष्ठ पत्रकार असद मौलाना आणि शेख बाबू प्रल्हाद मुत्तलवाड सल्लम मिर्झा शेख रफिक ह्या सगळ्यांनी मिळून परिसरात स्वच्छता केली यावेळी अनेक नागरिक उपस्थित होते