रुग्णालय प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी/संजीवकुमार गायकवाड
नांदेड :दि.१२.जिल्यातील माहूर आदिवासी आश्रम शाळेतील रोहित मुकाडे या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू चे गुड कायम असून नांदेड येथे झालेल्या इन कॅमेरा शवविच्छेदन च्या अहवाला कडे सर्वच्या नजरा लागल्या असून ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचे ” रेफर ” प्रकरण सध्या चर्चेत असून अहवाल प्राप्त होताच अजून मोठे गौड बंगाल पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आकस्मित मृत्यू नंतर अनेक शंका कुशंका व्यक्त करण्यात येत आहे.
नेमका मृत्यू कुठल्या कारणाने झाला याबाबत विविध रोहितचा मृत्यू रुग्णालयात येण्यापूर्वी झाला होता असाही एक मतप्रवाह रुग्णालय परिसरात झालेल्या वादातून समोर आला होता.रोहितला मंगळवारी दिनांक १० रोजी सायंकाळी ७ वाजून २० मिनिटांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तर ७.३० मिनिटाला उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी रेफर केले होते.
मृतकाच्या नातेवाईकांनी आणि आदिवासी संघटनेच्या लोकांनी काही विद्यार्थ्या सोबत रोहित च्या मृत्यू प्रकरणी माहिती घेतली असता रोहित खूप वेळ पासून झोपूनच होता,अशी माहिती काही चिमुकल्या विद्यार्थ्यांनी त्यांना दिल्या वरून संशयाला जागा झाली आहे.
जर पुढे येत असलेल्या शंके प्रमाणे शवविच्छेदन अहवालात जर माहूर रुग्णालय दाखल करण्यापूर्वीची वेळ आढळून आली तर रुग्णालय प्रशासन सुद्धा चौकशी च्या फेऱ्यात अडकणार आहे.
माहूर ग्रामीण रुग्णालय दि.१० रोजी कोण कोणत्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक होती हे ही तपासणे या निमित्याने कर्मप्राप्त होणार असून शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण व वेळ पुढे येणार असल्याने तुर्तास सर्वांचे अहवाला कडे नजरा लागल्या असून कामात चुकार पणा करणाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे.