जल जीवन मशीनच्या कामाखाली गावातील अंतर्गत रस्त्याचा झाला चकणा चोर…

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे 
नायगाव – तालुक्यातील मौजे सालेगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेल्या जल जीवन मशीन अंतर्गत काम जोमात असून मात्र गावातील अंतर्गत रस्त्याची मात्र कीव येताना दिसून येत नाही. त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांचा सत्यानास झाला आहे. गावातील रस्ते गेले अनेक वर्षापासून कसेबसे तयार झाले होते मात्र शासनाने जल जीवन मशीन च्या नावाखाली आखून दिल्याप्रमाणे गावातील अंतर्गत रस्त्याचा मध्यभागी खोदकाम करून त्यातून पाईपलाईन करण्याचे नियोजन केले असून त्यामुळे गावातील रस्त्याचा मात्र निश्चितपणे चकणा चोर झालेला दिसून येतो आहे.
सदर योजनेचा गावकऱ्यांना लाभ मिळतो आहे पण एका योजनेच्या कामाखाली गेल्या अनेक वर्षापासून गावातील विविध प्रकारचे विकास आराखडे तयार करून गावातील विकास कामासाठी वेगवेगळे प्लॅन तयार करून व वेगवेगळ्या माध्यमातून निधी कसाबसा घेऊन गावातील अनेक लोकप्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले आहे. महत्त्वपूर्ण विकास काम देखील झालेले होते. परंतु या जल जीवन मशीन अंतर्गत काम चालू असलेल्या योजनेमुळे गावातील रस्त्याचा मात्र चकणात चोर झालेला दिसून येतो आहे.
सदर कामात शासनाच्या नियम व अटीनुसार काम करायचे तर गावातील अंतर्गत रस्त्याचा मात्र सत्यानाश झालेला दिसून येत आहे. एकंदरीत शासनाला गावातील विकास कामे हवे आहेत की झालेले विकास कामाचा पल्ला नष्ट करायचा आहे हेच प्रश्न आता गावकऱ्यांच्या वतीने उपस्थित होताना दिसून येत आहे. सदर जल जीवन मशीन चे काम केले अनेक महिन्यापासून राज्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे आणि प्रामुख्याने ग्रामीण भागात विकास कामे झपाट्याने होत नसून त्यात झालेल्या विकास कामावर अशा योजना येऊन महत्त्वकांक्षी अंतर्गत रोडावर सदर जल जीवन मशीन योजनेच्या कामामुळे एकंदरीत गदा आणून झालेल्या अंतर्गत रस्त्यावर नांगर फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.
सदर कामाने गावातील अंतर्गत रस्त्याचा मोठा चकणाचूर झालेला आहे. हेच अंतर्गत रस्ते पुन्हा नव्याने कधी होतील याची चिंता मात्र आता गाव वशियांना पडल्याचे दिसून येत आहे. गावाच्या विकास कामात अनेकांचे मोलाचे योगदान राहिलेल्या व्यक्तीकडून आता नाराजीचा सूर उमटताना दिसून येत आहे. करायला गेले एक झाले एक हीच गत झाल्याचे दिसून येत आहे.

Share This Article
error: Content is protected !!