हुस्सा,धनंज,मेळगाव,सांगवी, रस्त्यावरील पाईप कलवट चे अति निकृष्ट दर्जाचे काम……

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

रस्त्याचे व कलवटचे काम मजबूत करून देण्याची गावकऱ्यांची मागणी.

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे 
नायगाव तालुक्यातील रस्त्याचे काम चालू असलेल्या हुस्सा धनंज मेळगाव सांगवी रस्त्यावरील पाईप कलवट चे काम अति निकृष्ट दर्जाचे झाले असून संबंधित प्रशासनाचे सदर कामाकडे मोठे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून खड्डे मय झाला होता पण त्या रस्त्याला अच्छे दिन येतील अशीच अपेक्षा येथील नागरिकांना असता त्यातच संबंधित कंट्राकदाराकडून मात्र जाणून बुजून रस्त्याचे व कलवटचे काम अति निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. रस्त्याच्या कामात सारवा सरव होताना दिसून येत आहे.
सदर रस्त्यासाठी शासनाने कोट्यावधीचा निधी पुरवला असून देखील मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराकडून मात्र कामात हलगर्जीपणा करून कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा आता येथील गावकऱ्यांकडून होताना दिसून येत आहे. सदर रस्त्यावरील पाईप कलवट चे काम केवळ मशीनच्या साह्याने खोदकाम करून त्यात कुठल्याच प्रकारची भरण न भरता किंवा त्या खोदकामावर बेस मजबूत न करता पूर्णतः त्यावर अवजड पाईप बसवले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून किंवा कलवट वरून एकांदा अवजड वाहन गेले तर ते कलवट वरील पाईप पूर्णपणे जमिनीत उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंवा त्या वाहनाला धोका निर्माण होण्याची चित्र असल्याचे सांगण्यात येत आहे.
म्हणून याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन कामात पारदर्शकता आणून संबंधित कंट्राकदाराना सदर रस्त्याचे काम मजबूत करून देण्याचे निर्देश देण्यात येतील का अशी अपेक्षा आता प्रशासनाकडे होताना दिसून येत आहे. जर कामात सारवा सारव झाली तर सदर रस्त्याची तक्रार वरिष्ठाकडे करून संबंधित इंजिनिअर व संबंधित कंट्रकदार यांच्याविरुद्ध शासन दरबारी आवाज उठवू असा खणखणीत इशारा देखील हुस्सा, धनंज, मेळगाव, सांगवी, येथील नागरिकाकडून देण्यात आला आहे.

Share This Article
error: Content is protected !!