भोकर प्रतिनिधी
भोकर तालुका येथील सकल मराठा समाजाणे चालू असलेल्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जारांगे पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी भोकर येथील सकल मराठा समाजाने भोकर तहसील च्या समोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाला सकल मराठा समाजातील कार्यकर्ते शिवाजी पाटील किनाळकर, सुरेश पाटील डुरे, माधव पाटील वडगावकर, शंकर पाटील बोरगावकर, शिवाजी माने, सिद्धेश्वर ढवळे चिंचाळकर, राजू पाटील कवडे, दशरथ पाटील कदम, दर्शन पाटील डूरे, गणेशराव कापसे, किशोर पाटील, विशाल पाटील माने, सतीश गायकवाड कोळगाव, गोविंद पाटील ढगे चीदगिरी, जितेंद्र पाटील सायाळकर, विनायक गायकवाड, अमोल शिंदे, विशाल माने , धोंडगे पाटील,आनंद पाटील आदी सखल मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते.