सगरोळीत सेवा गौरव सोहळ्याचे 15 नोव्हेंबरला आयोजन. पाटील व गिरगाव यांचा सत्कार माजी विद्यार्थी गौरव समितीचा पुढाकार.

abhishek bakkewad
2 Min Read
Spread the love

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड/अशोक वाघमारे 
नांदेड – जिल्ह्यातील संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेचे माजी विद्यार्थी दत्ता उत्कृष्ट पणे प्रशासक सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल बालाजी पाटील खतगावकर मधु गंगाराम गिरगावकर सगरोळी येथे बुधवारी दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सेवा गौरव सोहळ्याचे आयोजन माजी विद्यार्थी गौरव समितीच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ अंतर्गत श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे संस्थेचे माजी विद्यार्थी बालाजी पाटील खतगावकर मधु गिरगावकर यांनी शिक्षणाचे धडे घेऊन आज घडीला त्यांना आपल्या क्षेत्रात छाप टाकली आहे बालाजी पाटील खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव म्हणून धुरा सांभाळत आहेत तर मधु गिरगावकर हे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली आहे ते नुकतेच निवृत्त झाले आहेत कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या संस्कारामुळे घडले आहे दरम्यान हा सेवा गौरव सोहळा शारदा नगर येथील वसुंधरा सभागृहात 15 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे या सोहळ्याला संस्थेचे शकडून माजी विद्यार्थी विविध संघटनेचे पदाधिकारी तालुक्यातील सरपंच उपसरपंच चर्म तंटामुक्ती अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या सेवा गौरव सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख हे राहणार आहेत तर सेवानिवृत्त जिल्हा वन अधिकारी कामाजी पवार उत्तमराव सोनकांबळे पाटबंधारे विभागाची सेवानिवृत्त भूप अभियंता हनुमंत गोपलवाड सैनिकी विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य अरविंद देशमुख अशोक गोखछडे डॉक्टर मधुकर गायकवाड डॉक्टर प्रल्हाद राठोड नजीर शेख विश्वनाथ कोंडेकर आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या सेवा गौरव सोहळ्याला उपस्थित राहण्याची आव्हान माजी विद्यार्थी गौरव समितीच्या वतीने करण्यात.

Share This Article
error: Content is protected !!