कुंटूर ग्रामपंचायत वर धडकला घागर मोर्चा साठे नगर येथील महिला पुरुष व अपंग व्यक्तीं मोर्चात सामील..

abhishek bakkewad
3 Min Read
Spread the love

 

नायगाव ता प्रतिनिधी/अशोक वाघमारे 

नायगाव तालुक्यातील कुंटूर ग्रामसेवक ,सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा माघारी परतला
कुंटूर वार्ताहर
नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील ग्रामसभा सर्वात मोठी ग्रामसभा निवडणूक ओळखले जाते गावकऱ्यांनी बिनविरोध ग्रामसभा काढून गावातील समस्या सुटतील व आम्हाला चांगल्या प्रकारे घरे व विविध योजनेचा लाभ मिळाले असे नाही सदर ग्रामपंचायत बिनविरोध काढले आहे मात्र विरोध ग्रामपंचायत मध्येच नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र हे दिसून आले असून साठे नगर येथील महिलांनी गावातील मुख्य रस्त्याने घागर मोर्चा घेऊन ग्रामपंचायत वर घागर मोर्चा काढला आहे
पाण्याची अनियमितता होत असून पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. वर्षे झाला नालीचा साफसफाई केली जात नाही रस्त्यावर कचऱ्याची ढिगारे अशा अनेक समस्या घेऊन महिलांनी ग्रामपंचायतवर घागर मोर्चा घेऊन नेला ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच प्रतिनिधी यांनी महिलांना आश्वासन देऊन माघारी पाठवले.
सदर 17 तारखेपर्यंत हातपंपामध्ये मोटर टाकून पाण्याची सुविधा करून देण्यात येईल. साफसफाई करण्यात येईल . सफाई करण्यात येईल अशी आश्वासन दिल्यानंतर सदर महिला माघारी परतल्या मात्र ग्राम विकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे काम झाले नाहीतर पुन्हा घागर मोर्चा घेऊन जाणार असल्याची नागरिक व महिलांनी यावेळी बोलून दाखवले.
ग्रामपंचायतच्या कारभाराचा कळस असल्याचे काही महिला पुरुषांनी ओरड सुरू केले असून जगावे तरी कसे. गावातील नागरिकांना कोणतेही पाणी शौचालय रस्ते अशा विकास ,नाली बांधकाम करणे आवश्यक असतानाही मागासवर्गीयांना डावले जात असल्याचा प्रकार होत आहे .असे चर्चा महिला वर्गांनी केली आहे . त्यामुळे पाणी भरावा का कामाला जावं पोट कस भरणार पाण्यासाठी वनवन भटकत करावी लागत आहे. आमच्या हक्काचं पाणी ग्रामपंचायत देणार आहे का नाही अशी विचारणा व घोषणा करत सदर गावातील मुख्य रस्त्याने ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा घेऊन गेला. सदर हिवाळ्यात तच घागर मोर्चा नेणारी ग्रामसभा हि कुंटूर ग्रामसभा आहे.
निवडणुकीमध्ये बिनविरोध ग्रामसभा निवड केल्यानंतर ग्रामपंचायत म्हणून कुंटुर ओळख असताना सुद्धा नागरिकांच्या समस्या मात्र वाढले असून. सदर कुंटूर गावात विविध समस्यांनी ग्रासले असताना ग्रामविकास अधिकारी यांना काहीच घेणे देणे नसल्याचे दिसून येते आहे.ग्रामसेवकांची वेळेवर गावकऱ्यांना सुविधा पुरवत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले 17 तारखेपर्यंत नागरिकांना पाणी मिळाले तर ठीक नाहीतर पुन्हा घागर मोर्चा घेऊन येणार अशी चर्चा नागरिकांनी केली आहे . ग्रामसेवक व सरपंच प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्य यांच्या आश्वासन सदर घागर मोर्चा माघारी परतला.

Share This Article
error: Content is protected !!